मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amit Shah : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी अन् अर्धी काँग्रेस; नांदेडमधून अमित शहांचा शरद पवारांवरही घणाघात

Amit Shah : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी अन् अर्धी काँग्रेस; नांदेडमधून अमित शहांचा शरद पवारांवरही घणाघात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 11, 2024 08:26 PM IST

Amit Shah In Nanded : अमित शहा म्हणाले की, शरद पवारांनी युपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राला काय दिले, याचा हिशोब द्यावा. महाआघाडीची तीन पायांच्या रिक्षाला कोणतीही दिशा नाही. त्यांना कोणतेही भविष्य नाही.

नांदेडमधून अमित शहांचा शरद पवारांना सवाल
नांदेडमधून अमित शहांचा शरद पवारांना सवाल

Amit Shah Nanded Rally : नांदेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज सभा पार पडली. या सभेत अमित शहांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र झाले आहेत. एक नकली शिवसेना,नकली राष्ट्रवादी आणि एक आर्धी उरलेली काँग्रेस असून त्यांचे तीन तिघाडा काम बिघाडा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अमित शहा म्हणाले की, उद्धव ठाकरेंची शिवसेना आर्धी राहिलीय. शरद पवार यांची राष्ट्रवादी आर्धी राहिलीय, हे दोघे अर्धे काँग्रेसला अर्धी करण्याचे काम करत आहे. महाआघाडीतील हे तीन्ही पक्ष अर्धे असून ते महाराष्ट्राचं काय भलं करणार? ही तीन पायाची ऑटो रिक्षा आहे. मात्र राज्यातील सरकार अम्बेसिडरचं आहे, गिअरबॉक्स फियाटचं आहे, आणि इंजिन मर्सडीजचं आहे. त्यांच्या ऑटो रिक्षाला कोणतीच दिशा नाही. या रिक्षाला काहीच भविष्य नाही. आपापसातील मतभेदामुळेच ही आघाडी संपणार आहे. असा घणाघात अमित शहा यांनी केला.

आपल्याला यावेळी मतदान करायचं आहे ते नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी. मोदींच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर आणली आहे. देशात ४०० पारचा मोसम आहे. नांदेडचा मोसम बिघडला असेल तर तो काँग्रेसचा बिघडला असेल.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात की,काश्मीरचा महाराष्ट्र आणि राजस्थानशी काय संबंध? भाजप कुठेही जातो व काश्मीरमधील ३७० कलम हटवल्याचे सांगतो. मात्र मी तुम्हाला विचारतो कलम ३७० हटायला पाहिजे होतं की नको? काँग्रेस पक्ष ७० वर्षांपासून कलम ३७० एका लहान बाळासारखं सांभाळून ठेवलं होतं. मोदींनी ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० हटवून काश्मीरला भारताशी कायमचं जोडण्याचं काम केलं आहे,नांदेडचा बच्चा-बच्चा काश्मीरच्या लढाईसाठी तयार आहे,असा दावा अमित शाह यांनी केला.

शरद पवारांनी १० वर्षात महाराष्ट्राला काय दिले - शहा

अमित शहा म्हणाले माझा शरद पवारांना सवाल आहे की, तुम्हा १० वर्षे मनमोहन सरकारचे कर्ताधर्ता होता तेव्हा तुम्हा महाराष्ट्राला काय दिलं? याचा हिशोब मागायला नको का? पण ते देणार नाहीत. पण मी हिशोब सांगतो त्यांनी १० वर्षात महाराष्ट्राला १ लाख ९१ हजार कोटी रुपये दिले होते.

 

नरेंद्र मोदी सरकारने १० वर्षात ७ लाख १५ कोटी रुपये दिले आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाची मंडळी महाराष्ट्राचा विकास करु शकत नाहीत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचा विकास करु शकतात, असा दावा अमित शाह यांनी केला.

WhatsApp channel