आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha elections 2024 ) काँग्रेसने महाराष्ट्रातील आणखी दोन (congress candidate list ) उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील ही तिसरी यादी जाहीर करत धुळे आणि जालन्यातून उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने धुळ्यातून (dhule loksabha concituncy) डॉ. शोभा बच्छाव आणि जालन्यातून (jalna lok sabha constituency) डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
सांगलीची जागा महाविकास आघाडीने शिवसेनेला सोडली असली तरी काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंनी पुनर्विचार करावा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे सांगलीचा वाद पुरता मिटला नसल्याचे दिसत आहे. महाआघाडीमधील काँग्रेस महाराष्ट्रात १७ जागा लढवणार आहे, यातल्या १५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून आता केवळ मुंबईतील दोन जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. धुळ्यात शोभा बच्छाव यांचा सामना डॉ. सुभाष भामरे यांच्याशी तर जालन्यात कल्याण काळे यांचा सामना भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी होणार आहे.
महाविकास आघाडीत काही जागांवर असलेला पेच गुढीपाडव्यादिवशी सोडवला गेला. महाविकास आघाडीत अखेर जागावाटपाचा तिढा सुटला आहे. मंगळवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. महाविकास आघाडीने २१-१७-१० असा फॉर्म्युला निश्चित केला आहे. काँग्रेस १७, ठाकरे गट २१ तर राष्ट्रवादी १० जागांवर लढणार आहे.
नंदुरबार, धुळे, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई आणि मुंबई उत्तर पूर्व.
बारामती, शिरूर, सातारा, माढा, अहमदनगर दक्षिण, रावेर, भिवंडी, बीड, वर्धा, दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे.
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या मतदारसंघांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या