Congress Manifesto : काँग्रेस देणार ५ न्यायासह २५ गॅरंटी, जाहीरनाम्यात जुन्या पेन्शनसह ‘या’ गोष्टींवर राहणार फोकस!
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Congress Manifesto : काँग्रेस देणार ५ न्यायासह २५ गॅरंटी, जाहीरनाम्यात जुन्या पेन्शनसह ‘या’ गोष्टींवर राहणार फोकस!

Congress Manifesto : काँग्रेस देणार ५ न्यायासह २५ गॅरंटी, जाहीरनाम्यात जुन्या पेन्शनसह ‘या’ गोष्टींवर राहणार फोकस!

Published Mar 19, 2024 08:02 PM IST

Congress Manifesto : काँग्रेसच्या केंद्रीय कार्य समितीची दिल्लीतील मुख्यालयात बैठक पार पडली. यामध्ये लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये पक्षाचा जाहीरनामा काय असणार, यावर चर्चा झाली.

काँग्रेस वर्किंग समितीची बैठक
काँग्रेस वर्किंग समितीची बैठक

Lok Sabha Elections 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखांची घोषणा केल्यापासून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणूक प्रचाराच्या रणनितीसोबतच आला अजेंडा ठरवण्यात राजकीय पक्ष व्यस्त झाले आहेत. आपल्या जाहीरनाम्यातून जनेतला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस याबाबत सक्रीय झाली असून आज दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये पक्षाच्या जाहीरनाम्यावर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस यावेळी सच्चर समितीचा अहवाल तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊ शकते.

आज काँग्रेसच्या केंद्रीय कार्य समितीची दिल्लीतील मुख्यालयात बैठक पार पडली. यामध्ये लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये पक्षाचा जाहीरनामा काय असणार, यावर चर्चा झाली.

बैठकीनंतर लोकसभेसाठी पक्षाचा अजेंडा काय असेल याची माहिती देण्यात आली. काँग्रेस जनतेला ५ न्याय आणि २५ गॅरेंटी देणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, काँग्रेसच्या वर्किंग समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत जाहीरमान्यावर विचार-विमर्श केला गेला. भारत जोडो न्याय यात्रेचे पाच पांच स्तंभ – शेतकरी न्याय, युवक न्याय, महिला न्याय, कामगार न्याय आणि हिसेदारी न्यायमध्ये प्रत्येकी ५ गॅरंटी देण्यात आल्या.

सूत्रांकडून काँग्रेसचा संभाव्या जाहीरनाम्यातील काही गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये ओल्ड पेन्शन स्कीम, सच्चर कमिटीच्या सिफारशी लागू करणे,  त्याचबरोबर जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणे, तेथे विधानसभेच्या निवडणुका घेणे, त्याचबरोबर लडाखला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासनही काँग्रेस देऊ शकते.

 

वर्किंग कमिटीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, भारत जोडो न्याय यात्रेपासून पक्षाला गती मिळाली असून कामाचा हा वेग असाच कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. भारत जोडो यात्रेदरम्यान पक्षाने ५ न्याय गॅरंटी दिल्या. या गॅरेंटी तळागाळापर्यंत पोहोचवण्यात येतील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या