मराठी बातम्या  /  निवडणुका  /  lok sabha election : काँग्रेसने लडाखमधून सेरिंग नामग्याल यांना दिली उमेदवारी, भाजपने कापले होते तिकीट

lok sabha election : काँग्रेसने लडाखमधून सेरिंग नामग्याल यांना दिली उमेदवारी, भाजपने कापले होते तिकीट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 03, 2024 12:36 AM IST

Ladakh Lok Sabha Constituency : काँग्रेसने लडाखमधून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने भाजपचे विद्यमान खासदार सेरिंग नामग्याल यांना मैदानात उतरवलं आहे. भाजपने सेरिंग नामग्याल यांचं तिकीट कापलं होतं.

सेरिंग नामग्याल यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर
सेरिंग नामग्याल यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर

Ladakh Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी रात्री उशिरा आपली आणखी एक उमेदवारी यादी जाहीर केली. पक्षाने यामध्ये केवळ एकाच उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. काँग्रेसने लडाख लोकसभा मतदारसंघातून सेरिंग नामग्याल (tsering Namgyal) यांना आपला उमेदवार बनवले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नामग्याल लडाखमधून (Ladakh) भाजपचे विद्यमान खासदार आहेत. यावेळी भाजपने त्यांना तिकीट डावलून ताशी ग्यालसन यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने लडाखमधून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांचा सस्पेंस अजूनपर्यंत कायम आहे.

दरम्यान लडाखमध्ये यावेळी भाजपने ताशी ग्यालसन यांना आपला उमेदवार बनवले आहे. पार्टीने विद्यमान खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांचे तिकीट कापले आहे. ताशी यांनी बुधवारी आपले नामांकन दाखल केले.

लडाख व जम्मू-काश्मीरमधील लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व नॅशलन कॉन्फ्रेंसमध्ये आघाडी आहे. काँग्रेसने जम्मूमधील दोन आणि लडाख जागेवर आपले उमेदवार दिले आहेत. दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीर विभागातील तीन जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून आपले नामांकन दाखल केले.

उमर अब्दुल्ला यांचा सामना पीपुल्स कॉन्फ्रेंसचे अध्यक्ष सज्जाद लोन यांच्याशी आहे. पीडीपीने या जागेवर माजी राज्यसभा खासदार मीर फयाज यांना मैदानात उतरवले आहे. या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ मे असून २० मे रोजी मतदान होणार आहे.

’१० वर्षानंतर उमेदवारी अर्ज भरला’

उमर अब्दुल्ला यांनी म्हटले की, लोकसभेच्या या निवडणुका खूपच महत्वपूर्ण आहेत. कारण ५ ऑगस्ट २०१९ पासून जम्मू-काश्मीरमधील या पहिल्याच निवडणुका आहेत. १० वर्षानंतर मी एखाद्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमधील लोकशाहीची स्थिती समजते. मागील विधानसभा निवडणुका २०१४ मध्ये झाल्या होत्या. तेव्हापासून १० वर्षात विधानसभा निवडणुकाच झालेल्या नाहीत.

पालघरमधून डॉ. हेमंत सावरे यांना भाजपकडून उमेदवारी -

पालघर मतदारसंघातून दिवंगत माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पूत्र हेमंत विष्णू सावरा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप व शिंदे गटात पालघर मतदारसंघाचा जागावाटपाचा घोळ सुरू होता. अखेर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवले आहे. या जागेवर शिंदे गटाचे राजेंद्र गावित विद्यमान खासदार आहेत. त्यांचा पत्ता कट झाला आहे.

 

WhatsApp channel