Lok Sabha Election : काँग्रेसकडून उत्तर मुंबईमधून भूषण पाटील मैदानात, राज बब्बर यांनाही उमेदवारी जाहीर-lok sabha election congress candidate list congress announced bhushan patil candidate from north mumbai ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election : काँग्रेसकडून उत्तर मुंबईमधून भूषण पाटील मैदानात, राज बब्बर यांनाही उमेदवारी जाहीर

Lok Sabha Election : काँग्रेसकडून उत्तर मुंबईमधून भूषण पाटील मैदानात, राज बब्बर यांनाही उमेदवारी जाहीर

May 01, 2024 12:07 AM IST

North Mumbai : काँग्रेसने उत्तर मुंबई मतदारसंघातून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथे त्यांचा थेट सामना भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांच्याशी होणार आहे.

काँग्रेसकडून उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर (सांकेतिक छायाचित्र)
काँग्रेसकडून उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर (सांकेतिक छायाचित्र)

Lok sabha Election : काँग्रेसने आपली आणखी एक उमेदवारी यादी (congress candidate list) प्रसिद्ध करत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून भाजपकडून पियूष गोयल मैदानात आहेत. त्यामुळे येथे भूषण पाटील (Bhushan patil) विरुद्ध पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्यात थेट सामना रंगणार आहे.

राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा लोकसभा निवडणुकीचा सामना रंगला आहे. राज्यात ५ टप्प्यात मतदान होणार असून लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहेत. मात्र राज्यात काही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. उद्या (१ मे) रोजी याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान काँग्रेसने आज देशातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे आता पीयूष गोयल आणि भूषण पाटील यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. महाराष्ट्रासह हरियाणा व हिमाचलमधील दोन मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले. हरियाणातील गुरगाव, हिमाचलमधील कांगरा, हमीरपूर तसेच उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा झाली आहे.

राज बब्बर यांनाही उमेदवारी -

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज (३० एप्रिल) चार उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेसने तीन राज्यांतील चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने हरियाणातील गुरुग्राममधून अभिनेते राज बब्बर यांना उमेदवारी दिली आहे, हिमाचल प्रदेशच्या कांगडा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून सतपाल रायजादा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, उत्तर मुंबईतून भूषण पाटील काँग्रेसचा उमेदवार असतील. पाटील यांचा सामना भाजपचे ज्येष्ठ नेते पीयूष गोयल यांच्याशी असेल.

या जागांवर कधी होणार मतदान?
हरियाणाच्या गुरुग्राम जागेसाठी निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात, म्हणजेच २५ मे रोजी मतदान होणार आहे. हिमाचलच्या कांगडा आणि हमीरपूर या जागांवर सातव्या व अंतिम टप्प्यात, म्हणजेच १ जून रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील उत्तर मुंबई मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात, म्हणजेच २० मे रोजी मतदान होणार आहे.