मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Akola Lok Sabha: अकोल्यातून काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी, प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा नाहीच

Akola Lok Sabha: अकोल्यातून काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी, प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा नाहीच

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 01, 2024 11:03 PM IST

Akola Loksabha Constituency :अकोल्यात काँग्रेसकडूनप्रकाश आंबेडकर यांना पाठिंबादिला जाईल, अशीशक्यता वर्तवली जात होती. पण, आज पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. अकोल्यातून काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे.

अकोल्यातून काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी
अकोल्यातून काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी

काँग्रेसकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी दहावी उमेदवार यादी (congress candidates list) जाहीर करण्यात आली. काँग्रेसने वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर न करता अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभय पाटील यांना मैदानात उतरवले आहे. अभय पाटील यांच्या उमेदवारीने आता अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अकोला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून अनु धोत्रे व काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात लढत होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपचे उमेदवार अनु धोत्रे माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत. अकोल्यात काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबादिला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, आज पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे.काँग्रेसने दोन उमेदवारांची दहावी यादी प्रसिद्ध केली.अकोल्यासोबतच काँग्रेसने तेलंगणातील वारंगल मतदारसंघातील उमेदवारही जाहीर केलाआहे. काँग्रेसने वारंगलमधून कादियाम काव्या यांना उमेदवारी दिली आहे.

अकोल्यात काँग्रेस उमेदवार रिंगणात उतरल्याने येथे तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. अभय पाटील महाविकास आघाडीकडून लढणार हे रविवारीच स्पष्ट झालं होतं. त्याची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. ४ एप्रिल रोजी काँग्रेस नेते आणि महाआघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अभय पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

कोण आहेत अभय पाटील?

डॉ. अभय पाटील पेशाने डॉक्टर असून गेल्या ३० वर्षापासून ते अकोल्यात अर्थोपेडीक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. विघ्नहर्ता क्रिटीकल केअरचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तसेच अकोला आयकॉन हॉस्पिटलचे संचालकही आहेत. तसेच ते काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते व राहिले आहेत.

WhatsApp channel