मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या? दोषींना शिक्षा होणारच”, अंजली दमानियांची माहिती

Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या? दोषींना शिक्षा होणारच”, अंजली दमानियांची माहिती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 01, 2024 08:57 PM IST

Maharashtra Sadan Scam : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह सर्व आरोपींना नोटीस बजावली आहे,अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ

शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (chhagan Bhujbal) यांनी लोकसभेसाठी शड्ड टोकला असताना त्यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा (Maharashtra sadan scam) प्रकरणात निर्दोष सुटलेले मंत्री छगन भुजबळ याच प्रकरणी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. छगन भुजबळांसह निर्दोष सुटका केलेल्या अन्य आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस जारी करण्यात आली असून चार आठवड्यांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना मनी लाँड्रींग प्रकरणातून निर्दोष सोडल्याच्या विरोधात अंजली दमानिया (Anjali damania) यांनी उच्च न्यायायात याचिका दाखल केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह सर्व आरोपींना नोटीस बजावली आहे, अशी माहिती अंजली दमानिया यांनी एक्सवरून दिली आहे.

 

एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत अंजली दमानिया यांनी म्हटले की, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. भुजबळांना सेशन कोर्टाने निर्दोष मुक्त केले होते. हा निकाल कसा चुकीचा आहे, याची माहिती आम्ही उच्च न्यायालयात दिली होती. आता. कोर्टाने सर्व आरोपींना नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहे. आम्ही कोर्टाला विनंती केली की या नोटीसा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत आरोपींना दिल्या जाव्यात २९ एप्रिलच्या आत छगन भुजबळांना एसीबी नोटीस पाठवणार आहे. दोषींना शिक्षा नक्कीच होणार यात शंका नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी ९ सप्टेंबर २०२३ रोजी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. यानंतर अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

IPL_Entry_Point