मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Rahul Gandhi : अमरावतीतून राहुल गांधींच्या शेतकरी अन् महिलांसाठी मोठ्या घोषणा, म्हणाले आम्ही कोट्यवधींना लखपती बनवणार

Rahul Gandhi : अमरावतीतून राहुल गांधींच्या शेतकरी अन् महिलांसाठी मोठ्या घोषणा, म्हणाले आम्ही कोट्यवधींना लखपती बनवणार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 25, 2024 09:24 AM IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी अमरावतीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत देशातील शेतकरी व महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या.

अमरावतीतून राहूल गांधींच्या शेतकरी अन् महिलांसाठी मोठ्या घोषणा
अमरावतीतून राहूल गांधींच्या शेतकरी अन् महिलांसाठी मोठ्या घोषणा

Rahul Gandhi : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यात अमरावती मतदारसंघाचा (Amravati Lok Sabha)समावेश आहे.दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावणार आहेत.आज काँग्रेस (Congress)खासदार राहुल गांधी यांनी अमरावतीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत देशातील शेतकरी व महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या.

ट्रेंडिंग न्यूज

नरेंद्र मोदींवर टीका करत करताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी देशातील २०-२५ लोकांना अब्जाधीश केलं, आम्ही करोडो लोकांना लखपती बनवणार आहोत. तुम्ही म्हणाल की काँग्रेसचं इंडिया आघाडीचं सरकारआल्यावर देशातील कोट्यवधी लोक लखपती कसे बनणार? हेच मी आज तुम्हाला सांगायला आलो आहे.

मोदी सरकार देशातील मोठं मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ करते. मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही. पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीच भरीव केलं नाही. मात्र आम्ही सत्तेत आल्यावर तुमचं कर्ज माफ करणार. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी आयोगाची (agricultural commission) स्थापना केली जाणार.

महिलांना प्रतिवर्षी एक लाख रुपये देणार -

राहुल गांधी म्हणाले, आमचे सरकार आल्यावर सर्वांत आधी महालक्ष्मी योजना लागू करणार. देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाची यादी बनवली जाईल. देशातील कोट्यवधी लोक अजूनही दारिद्र्यरेषेखाली राहतात. त्यांची यादी तयार केली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला लाभार्थी म्हणून निवडलं जाणार. या महिलेच्या खात्यात प्रतिवर्षी १ लाख रुपये तर महिन्याला ८ हजार ५०० रुपये जमा होणार. देशातील करोडो महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये ठकाठक ठकाठक ठकाठक पैसे येणार.

राहूल गांधी म्हणाले की, सध्याच्या काळात स्त्री आणि पुरुष दोन्ही जॉब करतात. ८ ते १० तास ते काम करत असतात. त्याचे महिला आणि पुरुषांना पैसे मिळतात. मात्र देशातील प्रत्येक काम करणारी महिला ८ तास बाहेर तर ८ तास घरात काम करत असते. ती स्वयंपाक करते, मुलांचं संगोपन करते, मात्र या ८ तासाचे तिला पैसे मिळत नाहीत. भारतातील हे सत्य आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे सरकार आल्यास भारतातील प्रत्येक गरिब महिलांच्या खात्यात एक लाख रुपये येणार आहेत.

 

अंगणवाडी सेविकांना दुप्पट मानधन, तर महिलांना ५० टक्के आरक्षण -

राहुल गांधींनी आपल्या भाषणात अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी म्हणाले,केंद्रात सत्ता आल्यानंतरअंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सचे मानधन दुप्पट केलं जाईल. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या सार्वजिनक क्षेत्रात महिलांना ५० टक्के आरक्षण दिले जाईल. प्रत्येक कुटूंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल. नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असेल.

WhatsApp channel