मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election : माझ्या आईच्या मंगळसूत्राने देशासाठी बलिदान दिलं; प्रियंका गांधींचं मोदींना प्रत्युत्तर

Lok Sabha Election : माझ्या आईच्या मंगळसूत्राने देशासाठी बलिदान दिलं; प्रियंका गांधींचं मोदींना प्रत्युत्तर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 24, 2024 12:24 AM IST

Priyanka Gandhi On Narendra Modi : युद्धाच्या वेळी इंदिरा गांधींनी आपले सोने देशासाठी दिले होते. माझ्या आईच्या मंगळसूत्राने देशासाठी बलिदान दिले आहे, असे प्रत्युत्तर प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदींच्या मंगळसूत्र राजकारणाला दिले आहे.

मंगळसूत्रावरून प्रियंका गांधींचं मोदींना प्रत्युत्तर
मंगळसूत्रावरून प्रियंका गांधींचं मोदींना प्रत्युत्तर

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार करताना म्हटले की, त्यांच्या आईचे मंगळसूत्र या देशासाठी कुर्बान झाले आहे. बेंगळुरुमध्ये एका रॅलीला संबोधित करताना प्रियंका गांधींनी म्हटले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५५ वर्षापर्यंत काँग्रेसचे सरकार होते. मात्र त्यावेळी कोणीही कोणाचे सोने व मंगळसूत्र (mangalsutra politics) हिसकावून घेतलं नाही.

ट्रेंडिंग न्यूज

नुकत्यात एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, देशाची संपत्ती लुटण्याचा आपला जन्मसिद्ध अधिकार समजणाऱ्या काँग्रेसची नजर आता महिलांच्या मंगळसूत्रावर आहे. अलीगड आणि हाथरस लोकसभा जागेवरील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करताना मोदींनी म्हटले की, काँग्रेस आणि इंडिया आघाडीची नजर आता तुमच्या कमाईवर व तुमच्या संपत्तीवर आहे. काँग्रेसचे राजकुमार (राहुल गांधी) यांचे म्हणणे आहे की, त्यांचे सरकार आल्यास कोण किती कमावतो, किती संपत्ती आहे, घरे आहेत, याची चौकशी केली जाईल. इतकेच नाही तर ही संपत्ती सरकार आपल्या ताब्यात घेऊन सर्वांमध्ये समान वाटप करेल. असे त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. आमच्या माता-भगिनींकडे सोने असते त्यांच्या मंगळसूत्रावरही त्यांची नजर आहे.

पीएम मोदींवर पलटवार करताना प्रियंका गांधींना म्हटले की, मागील २ दिवसांपासून म्हटले जात आहे की,काँग्रेस पार्टी तुमचे मंगळसूत्र आणि सोने हिसकावून घेणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाले आणि त्यातील ५५ वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात कोणी तुमचे सोने, मंगळसूत्र हिसकावून घेतले? युद्धाच्या वेळी इंदिरा गांधींनी आपले सोने देशासाठी दिले होते. माझ्या आईच्या मंगळसूत्राने देशासाठी बलिदान दिले आहे. सत्य हे आहे की, हे लोक महिलांचा संघर्ष समजू शकत नाहीत.

दोन दिवसापूर्वी कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथील सभेला संबोधित करताना प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी आरोप केला होता की, देशातील सर्वात मोठ्या नेत्याने नैतिकताच सोडली आहे. ते लोकांसमोर नाटक करतात व सत्याच्या मार्गावरून भटकत आहेत.विरोधकांचा आवाज दाबून, त्यांचे बँक खाते गोठवूनतसेच दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकून विरोधकांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका जमान्यात जेव्हा देशाचा एक नेता उभा रहात होता, तेव्हा देशवासीयांना आशा होती की, तो व्यक्ती नैतिक असेल. मात्र आज देशातील सर्वात मोठ्या नेत्याने नैतिकताच सोडली आहे.

WhatsApp channel