Hatkanangle lok sabha : हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे टेन्शन वाढणार; आमदार प्रकाश आवाडेही लोकसभेच्या रिंगणात!
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Hatkanangle lok sabha : हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे टेन्शन वाढणार; आमदार प्रकाश आवाडेही लोकसभेच्या रिंगणात!

Hatkanangle lok sabha : हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे टेन्शन वाढणार; आमदार प्रकाश आवाडेही लोकसभेच्या रिंगणात!

Apr 12, 2024 03:29 PM IST

Hatkanangle Lok Sabha : आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने धैर्यशील माने यांचे टेन्शन वाढणार आहे. त्याचबरोबर या मतदारसंघात पंचरंगी लढत पाहायला मिळू शकते.

आमदार प्रकाश आवाडेही लोकसभेच्या रिंगणात
आमदार प्रकाश आवाडेही लोकसभेच्या रिंगणात

तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज दाखल करण्याची सुरूवात आजपासून होत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही (Hatkanangle lok sabha constituency) तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे रोजी मतदान होणार आहे. मात्र अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी महायुतीला येथे जबर धक्का बसला आहे. आमदार प्रकाश आवाडे (Mla Prakash awade )यांनी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. ताराराणी आघाडीकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

हातकणंगले मतदारसंघातून (Hatkanangle Lok Sabha) आमदार आवाडे यांनी शड्ड ठोकल्याने ही निवडणूक आता पंचरंगी झाली आहे. प्रकाश आवाडे म्हणाले की, या मतदारसंघात आता जातीचं कार्ड चालणार नाही, कोण विकास करतो यावरच येथे विजयाचं समीकरण असणार आहे.

हातकणंगलेची निवडणूक पंचरंगी होणार?

हातकणंगले मतदारसंघातून महायुती व महाविकास आघाडीसह स्वाभिमानी संघटना व वंचितच्या उमेदवारीने चुरस वाढली असतानाच आता आवाडेही रिंगणात उतरल्याने हातकणंगलेची लढत पंचरंगी होणार आहे. प्रकाश आवाडे यांनी अर्ज दाखल केल्यास व ते निवडणुकीच्या रिंगणात शेवटपर्यंत राहिले तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (dhairyasheel mane) यांना नुकसान होऊ शकते. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना रिंगणात उतरवले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून डी. सी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर आता प्रकाश आवाडे हातकणंगले मतदारसंघातील पाचवे उमेदवार असणार आहेत.

निवडणूक लढवून पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणार -आवाडे

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले की, मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असून माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा असणार आहे. माझं काम संपूर्ण राज्याला माहिती आहे. कामाच्या शोधात माझा मतदारसंघ इचलकरंजीमधील एकही माणूस मुंबई-पुण्याला किंवा बाहेरच्या राज्यात नाही. त्यामुळे ही निवडणूक लढवणार व जिंकणार असल्याचा विश्वास आवाडे यांनी व्यक्त केला.

आवाडे म्हणाले की, मला मतदारसंघात उभे राहण्यास कोणीही सांगितले नाही, किंवा मी बंडखोरी करत नाही. जनता मत वाया घालवत नाही, त्यामुळे जनताच ठरवेल की खासदार कोण असावा. खासदार कसा असावा व खासदार काय काम करू शकतो, हे दाखवून देणार असल्याचे आवाडे म्हणाले.

Whats_app_banner