Lok Sabha Elections 2024: 'मत द्या आणि बक्षीसे जिंका’ चंद्रपुरात मतदारांची संख्या वाढवण्यासाठी स्पर्धेचं आयोजन
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Elections 2024: 'मत द्या आणि बक्षीसे जिंका’ चंद्रपुरात मतदारांची संख्या वाढवण्यासाठी स्पर्धेचं आयोजन

Lok Sabha Elections 2024: 'मत द्या आणि बक्षीसे जिंका’ चंद्रपुरात मतदारांची संख्या वाढवण्यासाठी स्पर्धेचं आयोजन

Apr 12, 2024 07:52 AM IST

Chandrapur Lok Sabha constituency : लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करण्यासाठी जबाबदारीने घराबाहेर पडावे, यासाठी चंद्रपुरातील जिल्हाधिकाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले.

लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातील नागरिकांसाठी मत द्या आणि बक्षीसे जिंका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातील नागरिकांसाठी मत द्या आणि बक्षीसे जिंका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. (HT)

Chandrapur Vote and win prize competition: मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. मात्र, अद्याप असे काही मतदार आहेत, जे मतदान करण्यास टाळाटाळ करतात. मात्र, अशा मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी चंद्रपुरातील जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक १९ एप्रिल २०२४ रोजी २ हजार ११८ मतदान केंद्रावर होणार आहे. सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे यात सहभाग घेऊन विजेत्या पहिल्या तीन मतदारांना अनुक्रमे मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल मिळणार आहे.

Amit Shah : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी अन् अर्धी काँग्रेस; नांदेडमधून अमित शहांचा शरद पवारांवरही घणाघात

कशी असेल स्पर्धा?

चंद्रपुरातील मतदारांनी मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवून मतदान केंद्रासमोर सेल्फी काढायचा आहे. त्यानंतर हा फोटो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chanda.nic.in/en/divisions/collector-office-contact-details/ या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे आणि ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे.

Chhatrapati Shahu Maharaj: आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत; ते दत्तक आहेत, खासदार मंडलिकांचे वादग्रस्त विधान

बक्षीस

स्पर्धेत भाग घेणाऱ्या मतदाराला प्रथम पारितोषिक म्हणून १ लाख ६० हजारांची अपाची मोटारसायकल दिली जाणार आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक उच्च प्रतीची रेसींग सायकल आणि तृतीय पारितोषिक ॲड्राईड मोबाईल फोन देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जातीस्त जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान

पहिला टप्पा (१९ एप्रिल २०२४): रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.

दुसरा टप्पा (२६ एप्रिल २०२४): बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.

तिसरा टप्पा (७ मे २०२४): रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.

चौथा टप्पा (१३ मे २०२४): नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड.

पाचवा टप्पा (२० मे २०२४): धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण.

Whats_app_banner