वर्ल्डकप स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी
आकड्यांच्या भाषेतच सांगायचं झाल्यास ऑस्ट्रेलिया हा तब्बल ५ वेळा विश्वचषक जिंकणारा एकमेव क्रिकेट संघ ठरला आहे. सलग तीन वेळा विश्वचषक जिंकण्याची किमया देखील या संघानं करून दाखवली आहे. ऑस्ट्रेलियन संघ १९९९ ते २०११ या काळात झालेल्या विश्वचषक स्पर्धांमध्ये ३४ सामन्यांमध्ये अजिंक्य ठरला होता. ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट, ग्लेन मॅकग्रा आणि रिकी पाँटिंग यांच्या नावावर सर्वाधिक विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा विक्रम आहे. ऑस्ट्रेलियासाठी या तिघांनी अनेक विक्रम केले आहेत. २००३ मध्ये नामिबियाविरुद्ध अवघ्या १५ धावांत ७ विकेट घेण्याचा विक्रम मॅकग्राच्या नावावर आहे. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ७ गोलंदाजांनी एकाच सामन्यात ५ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. त्यात मॅकग्रा एक आहे. मिचेल स्टार्क यानं कारकिर्दीत तीनदा ही कामगिरी केली असून तो या यादीत अव्वल स्थानावर आहे
ऑस्ट्रेलियचा खेळाडू डेनिस लिली यानं १९७५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वप्रथम ५ विकेट घेतल्या होत्या. त्याचा सहकारी गॅरी गिलमोर यानंही याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत सलग ५ बळी घेतले होते. मात्र ही स्पर्धा वेस्ट इंडिजनं जिंकली. नागपुरात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचे तीन फलंदाज चेतन शर्माच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाले. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत केवळ एकाच गोलंदाजानं सलग ४ गडी बाद केले आहेत. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा याच्या नावावर हा विक्रम आहे. २००७ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यानं सलग चार गडी टिपले होते
फलंदाजीच्या बाबतीतही विश्वचषक स्पर्धांमध्ये अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. विश्वचषकातील पदार्पणाच्या आणि शेवटच्या सामन्यात शतक करण्याचा अनोखा विक्रम इंग्लंडचा खेळाडू डेनिस एमिसच्या नावावर आहे. त्यानं भारताविरुद्ध विश्वचषकातील पहिलं शतक झळकावलं होतं. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत १९६ शतकांची नोंद झाली आहे. सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्या नावावर प्रत्येकी ६ शतकं आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. १९७५ च्या विश्वचषक फायनलमध्ये लॉइड यांनी पहिलं शतक झळकावलं होतं. विश्वचषकात दीडशेच्या वर धावा करण्याची कामगिरी सर्वात आधी भारताचा माजी कर्णधार कपिल देव यानं केली होती. त्यानं वेस्ट इंडिज विरुद्ध १७५ धावांची नाबाद खेळी केली होती. २०१५ मध्ये कुमार संगकारानं सलग ४ शतकं झळकावली होती. रोहित शर्मानं २०१९ साली ५ शतकं झळकावून हा विक्रम मोडला
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत पाच सामने अनिर्णित राहिले आहेत. २०११ मध्ये नागपुरात भारत आणि इंग्लंड यांच्यात ६७६ धावांची बरोबरी झाली होती. दोन्ही संघांनी प्रत्येकी ३३८ धावा केल्या. मात्र, सर्वाधिक थरारक आणि संस्मरणीय क्षण २०१९ च्या विश्वचषक फायनलमधील आहे. सुपर ओव्हर टाकून निर्णय झालेला विश्वचषकातील हा एकमेव सामना होता.
Highest Score
SR: Strike Rate, Mat: Matches, Inn: Innings, NO: Not Out, HS: Highest Score, Avg: Average, RS: Run Scored, VS: Vs Team, BF: Ball faced, TS: Team Score, BBF: Best Bowling Figures, Wkts: Wickets, RG: Runs Given, Ovr: Overs, Mdns: Maidens, EC: Economy, T-SC: Team Score, Vnu: Venue.
Best Strike Rate

Most Fifties

Most Hundreds

Most 4s

Most 6s

Most Thirties

Best figures

Best Bowling Strike Rate

Highest Team Total

Lowest Team Total

बातम्या
विश्वचषक स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी (FAQs)
ऑस्ट्रेलिया हा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलिया एकूण ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे. १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ वर्ल्ड ऑस्ट्रेलियानं हा पराक्रम केला होता
१९९९ सालापासून क्रिकेट विश्वात दबादबा निर्माण करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं पुढील ३ स्पर्धांमध्ये सलग ३४ सामने जिंकले आहेत. २०११ च्या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारतानं स्पर्धा जिंकत ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला
विश्वचषकाच्या इतिहासात २००० हून अधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे. त्यानं ४५ सामन्यांत २२७८ धावा केल्या आहेत. त्याच्याच नावावर विश्वचषकातील सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.
सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा या दोघांच्या नावे सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. दोघांनी प्रत्येकी ६ शतकं झळकावली आहेत. सचिननं १९९२ आणि २००७ च्या विश्वचषकात शतकं झळकावली होती. १९९६ आणि २०११ सालच्या स्पर्धेतही त्यानं २ शतकं झळकावली होती. रोहितनं २०१९ च्या स्पर्धेत ६ पैकी तब्बल ५ शतकं झळकावली. रोहित यंदा देखील विश्वचषक खेळत असल्यानं त्याला नवा विक्रम करण्याची संधी आहे.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याच्या नावावर आहे. त्यानं ७१ विकेट्स घेतल्या आहेत.
विश्वचषकात हॅटट्रिक अनेक गोलंदाजांनी घेतील. मात्र, श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा यानं घेतलेली हॅटट्रिक खास आहे. त्यानं सलग चार चेंडूंवर चार गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. ही एक दुर्मिळ हॅटट्रिक आहे.
विश्वचषक क्रिकेटमध्ये दोन भारतीय गोलंदाजांनी हॅटट्रिक घेतली आहे. १९८७ मध्ये चेतन शर्मानं न्यूझीलंड विरुद्ध हा पराक्रम केलाय. तर, २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शामी यानं अफगाणिस्तान विरुद्ध ही कामगिरी केली आहे.