वर्ल्डकप २०२३ वेळापत्रक
विश्वचषकातील सर्व ४८ सामने १० ठिकाणी होणार आहेत. २०११ साली घरच्या मैदानावर मिळवलेल्या शानदार विजयानंतर विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदाच भारतात होत आहे. भारतीय संघाचे सामने चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, पुणे, धर्मशाला, लखनौ, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि अहमदाबाद येथील मैदानांवर होणार आहेत. आश्चर्य म्हणजे, ५५ हजारांची प्रेक्षक क्षमता असलेला, ५ कसोटी, ७ वन डे आणि ३ टी-२० सामन्यांचा साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक राजीव गांधी स्टेडियमवर विश्वचषकाचा एकही सामना होणार नाही. दोन्ही सेमीफायनल सामन्यांसाठी राखीव दिवस असेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाशी पहिला सामना खेळेल. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघांनंतर भारतापुढं खरं आव्हान असेल ते न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाचं. इंग्लंडविरुद्ध लखनौ येथे व न्यूझीलंडविरुद्ध धर्मशाळा इथं भारताचा सामना होईल. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला याच दोन संघांकडून पराभव पत्करावा लागला होता.
विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल झाला होता. १५ ऑक्टोबरला नवरात्रीचा पहिला दिवस असल्यानं सुरक्षाव्यवस्थेवर ताण येईल अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद इथं होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख १४ ऑक्टोबर करण्यात आली होती. तसंच, हैदराबादमध्ये होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या
इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेची घोषणा वर्षभर आधीच करण्यात आली होती. त्यामुळं स्पर्धेविषयी होणाऱ्या उलटसुलट चर्चेला फारसा वाव मिळाला नव्हता. काही कारणास्तव आयीसीसीनं देखील वेळापत्रक गुलदस्तात ठेवलं होतं. बीसीसीआयनंही तीच भूमिका कायम ठेवली.
| सामने | तारीख | वेळ | ठिकाण |
|---|
बातम्या
विश्वचषक २०२३ वेळापत्रक FAQs
होय. सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर विश्वचषक सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.
आयसीसी विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, स्कॉटलंड आणि श्रीलंका हे दहा संघ खेळणार आहेत. यापैकी स्कॉटलंड आणि श्रीलंका हे पात्रता फेरीतील स्पर्धा जिंकून पात्र ठरले आहेत. तर उर्वरित आठ संघ थेट पात्र ठरले आहेत.
या क्षणी पाकिस्तानमध्ये कोणताही विश्वचषक होणार नसला तरी २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी हा देश आयोजित करणार आहे.
विश्वचषक २०२३ चा राऊंड-रॉबिन फेरी ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. परंतु सराव सामने एक आठवडा आधीच २० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान होतील.
विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा पहिला सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे.
क्रिकेट विश्वचषक २०२३ चा सलामीचा सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड संघामध्ये होणार आहे.
नॉकआऊटसह विश्वचषकातील एकूण ४८ सामने खेळवले जातील. हे सामने १० वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत.
विश्वचषकातील उपांत्य फेरीचे दोन सामने अनुक्रमे मुंबईतील वानखेडे स्टेडियम व कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर होतील.



