वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावा


एकदिवसीय विश्वचषक जिंकणे हे क्रिकेटचे शिखर आहे आणि या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा भारतात होत आहे. या स्पर्धेसाठी १० संघ क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतील. याआधी १२ वनडे क्रिकेट वर्ल्डकप झाले आहेत. यामध्ये जगभरातील क्रिकेटपटूंनी प्रतिष्ठित आणि संस्मरणीय कामगिरी केली आहे, अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत आणि त्यांच्या संघांना सर्वोच्च यशाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत क्वचितच सचिन तेंडुलकरचे नाव शीर्षस्थानी नसेल. एकदिवसीय सामन्यांमध्ये सातत्याने उत्कृष्ट सलामी देणारा सचिन तेंडुलकर ६ विश्वचषकांमध्ये खेळला आहे. त्याची सरासरी ५६ पेक्षा जास्त आहे, परंतु वर्ल्डकप ट्रॉफीवर हात ठेवण्यासाठी त्याला त्याच्या करिअरच्या शेवटापर्यंत यावे लागले. वनडे विश्वचषकात २००० पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. तर या यादीत ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगच्या ५०० पेक्षा जास्त धावा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रिकी पाँटिंग ५ वर्ल्डकप खेळला आहे आणि त्याने तीन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे, यातील दोन वर्ल्डकपमध्ये तो कर्णधार होता. २००३ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये त्याने भारताविरुद्ध वेगवान शतकी खेळली होती. ही इनिंग सर्व चाहत्यांच्या कायम लक्षात राहणारी ठरली.

श्रीलंकेचा कुमार संगकारा हादेखील वर्ल्डकपमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी आहे. संगकारा ४ वर्ल्डकप खेळला. तसेच, तो सलग दोन वर्ल्डकप फायनल (२००७, २०११) खेळला आहे. २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये त्याने सलग ४ शतके ठोकून आपल्या विलक्षण कारकिर्दीचा समारोप केला. कर्णधार, यष्टिरक्षक आणि स्टार फलंदाज म्हणून संगाने त्याच्या संघासाठी हे सर्वकाही केले.

या यादीत पुढे आणखी एक डावखुरा फलंदाज आहे. ब्रायन लाराचे नाव या यादीमध्ये शोधणे योग्य आहे. लारा वेस्ट इंडिजसाठी ५ विश्वचषक खेळला आणि २००७ च्या वर्ल्डकपमध्ये आपल्या घरचा मैदानावर क्रिकेटला रामराम ठोकला.

यानंतर या यादीत पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आहे. मिस्टर ३६० एबी डीव्हिलियर्स केवळ ३ वर्ल्डकप खेळला. पण त्याने या तीन वर्ल्डकपमध्येच जगाला वेड लावले. एबीडीची विश्वचषक कारकीर्द लहान होती, परंतु एबीडीने ६३.५२ च्या सरासरीने ११७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करून चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. त्याचा विश्वचषक प्रवास मोठ्या हार्टब्रेकने संपला, त्यांचा २०१५ च्या सेमी फायनलमध्ये धक्कादायक पराभव झाला.
खेळाडूसंघधावास्टाइक रेटसामनेडावनाबादसर्वोच्च धासंख्यासरासरी३०धावाअर्धशतकशतकषटकार
1
Virat KohliVirat Kohli
IND7659011113117950639
2
Rohit SharmaRohit Sharma
IND597125111101315453131
3
Quinton de KockQuinton de Kock
SA594107101001745910421
4
Rachin RavindraRachin Ravindra
NZ57810610101123*6422317
5
Daryl MitchellDaryl Mitchell
NZ55211110911346922222
6
David WarnerDavid Warner
AUS535108111101634812224
7
Shreyas IyerShreyas Iyer
IND53011311113128*6613224
8
KL RahulKL Rahul
IND4529011104102753219
9
Rassie van der DussenRassie van der Dussen
SA4488410101133490228
10
Mitchell MarshMitchell Marsh
AUS44110710101177*4911221
11
Aiden MarkramAiden Markram
SA40611010101106451319
12
Dawid MalanDawid Malan
ENG404101990140442219
13
Glenn MaxwellGlenn Maxwell
AUS400150993201*6620222
14
Mohammad RizwanMohammad Rizwan
PAK39595982131*654115
15
Ibrahim ZadranIbrahim Zadran
AFG37676991129*471115

बातम्या

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा (FAQs)

कोणत्या संघाने सर्वाधिक विश्वचषक सामने जिंकले आहेत?

ऑस्ट्रेलियाने ८५ विश्वचषक सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी ६१ जिंकले आहेत आणि २१ गमावले आहेत (एक सामना बरोबरीत आणि २ रद्द). २००३ आणि २००७ च्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी एकही सामना गमावला नव्हता.

जिओ टीव्ही वर्ल्ड कप टेलिकास्ट करणार का?

नाही, विश्वचषकाचे प्रसारण हक्क Disney+ HotStar कडे असणे अपेक्षित आहे.

विश्वचषकातील सर्वोत्तम संघ कोणते आहेत?

भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे काही चांगले संतुलन असलेले संघ आहेत, जे यंदाच्या विश्वचषकात कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकतात.

विश्वचषकात भारताचा पहिला सामना कधी आणि कुठे होणार आहे?

भारताचा पहिला विश्वचषक सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.

आतापर्यंत कोण कोणत्या संघांनी विश्वचषक जिंकला आहे

ऑस्ट्रेलियाने ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे, त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी एकवेळा वर्ल्डकप ट्रॉफी उचलली आहे.

आयसीसी विश्वचषकाबद्दल काही अज्ञात तथ्ये काय आहेत?

विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या तीन आवृत्त्यांमध्ये प्रत्येकी ६० षटकांचे सामने खेळले गेले. तसेच, १९९५, १९७९, १९८३, आणि १९८७ हे वर्ल्डकप पांढऱ्या कपड्यांमध्ये झाले. सोबतच, इंग्लंडने सर्वाधिक ८ विश्वचषकांचे आयोजन केले आहे.