मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Cricket : पुढचा वनडे वर्ल्डकप तीन देश आयोजित करतील, संघ किती असतील, फॉरमॅट काय? पाहा

Cricket : पुढचा वनडे वर्ल्डकप तीन देश आयोजित करतील, संघ किती असतील, फॉरमॅट काय? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 21, 2023 11:12 AM IST

ODI World Cup 2027 : पुढील एकदिवसीय विश्वचषक आता २०२७ मध्ये होणार आहे. संघांची संख्या आणि फॉरमॅट यावेळच्या विश्वचषकापेक्षा खूप वेगळा असेल.

cricket world cup 2027
cricket world cup 2027 (PTI)

Cricket World Cup 2027 : क्रिकेट वर्ल्डकप २०२३ चा थरार संपला आहे. या स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सने पराभव करून जेतेपद पटकावले. सलग १० सामने जिंकून फायनलमध्ये एन्ट्री करणाऱ्या भारताचे वर्ल्ड चॅम्पियन बनवण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.

ट्रेंडिंग न्यूज

आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया करणार आयोजन

यानंतर आता टीम इंडियाच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांना आणखी ४ वर्षे वाट पाहावी लागणार आहे. वनडे क्रिकेटमधील पुढील विश्वचषक आता २०२७ मध्ये होणार आहे. या विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे आहे. पुढील विश्वचषकाचे आयोजन हे तिन्ही देश मिळून करणार आहेत.

आफ्रिका खंडात दुसऱ्यांदा विश्वचषक

आफ्रिका खंडात विश्वचषक खेळवण्याची ही दुसरी वेळ असेल. यापूर्वी २००३ मध्ये क्रिकेट विश्वचषक आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केनिया, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेसह यांनी मिळून या स्पर्धेचे आयोजन केले होते. 

पण त्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे ग्रुप फेरीतूनच बाहेर पडले होते पण केनियाने उपांत्य फेरी गाठली होती. केनियाला उपांत्य फेरीत भारतीय संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

२० वर्षांपूर्वी आफ्रिकेत झालेला हा विश्वचषक टीम इंडियासाठी संस्मरणीय ठरला. भारतीय संघ १९८३ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, त्यावेळीही भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

वर्ल्डकप २०२७ साठी खालील संघ पात्र

यजमान असल्याने, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे विश्वचषक २०२७ चा वर्ल्डकप खेळतील. परंतु नामिबियासोबत असे होणार नाही. पुढील काही वर्षांतील कामगिरीच्या जोरावर त्यांना वर्ल्डकपमध्ये आपले स्थान निर्माण करावे लागणार आहे. नामिबियाचा विश्वचषक प्रवेशाचा फॉर्म्युला इतर संघांप्रमाणेच राहील.

वर्ल्डकप २०२७ मध्ये किती संघ सहभागी होतील?

वर्ल्डकप २०२७ मध्ये १४ संघ सहभागी होणार आहेत. यापैकी २ संघ आधीच ठरलेले आहेत. यानंतर, आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल ८ संघांना विश्वचषकापूर्वी विश्वचषकाचे थेट तिकिटे मिळेल. उर्वरित ४ संघ क्वालिफायर सामन्यांद्वारे वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील.

वर्ल्डकप २०२७ चा फॉरमॅट काय असेल?

वर्ल्डकप २०२७ मध्ये प्रत्येकी ७ संघांचे दोन गट असतील.  ग्रुपमधील राऊंड रॉबिन टप्प्यानंतर दोन्ही गटातील शीर्ष ३ संघ पुढील फेरीत जातील. म्हणजेच दुसऱ्या फेरीत ६ संघ असतील. यानंतर एका गटाचा संघ दुसऱ्या गटातील सर्व संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. अशा प्रकारे या फेरीत प्रत्येक संघाचे ३ सामने होतील. या टप्प्यात २ संघ बाहेर पडतील आणि त्यानंतर उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल.

IPL_Entry_Point