विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज


एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ८ हे वेगवान गोलंदाज आहेत. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (४० सामन्यांत ६८ बळी) आणि दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर (२२ सामन्यांत ४० बळी) हे केवळ फिरकीपटू आहेत. मुरली ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राच्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर आहे. मॅकग्राने ३९ सामन्यांत ७१ विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर श्रीलंकेचा लसिथ मलिंगा २९ सामन्यांमध्ये ५६ विकेट्सह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रम (५५ बळी) आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क (४९ विकेट) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

मिचेल स्टार्कला आपल्या विकेट्सची संख्या वाढवण्याची संधी मिळणार आहे. तर या यादीतील बाकीचे गोलंदाज निवृत्त झालेले आहेत. ५० षटकांच्या मागील दोन वर्ल्डकपमध्ये स्टार्क सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता आणि या वेळी स्टार्कने त्याची पुनरावृत्ती केल्यास त्याला पहिल्या तीनमध्ये येण्याची चांगली संधी असेल. झहीर खान आणि जवागल श्रीनाथ हे प्रत्येकी ४४ विश्वचषक विकेट्ससह अव्वल १० मध्ये भारतीय गोलंदाज आहेत.

सोबतच स्टार्क वगळता न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (३९ विकेट) आणि टीम साऊदी (३४ विकेट) यांनाही आपल्या वर्ल्डकप विकेट्सची संख्या वाढवण्याची संधी असेल. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (३१ बळी). यालाही विकेटची संख्या वाढवण्याची संधी आहे. दरम्यान, भारतीय पीचेस या स्पिनर्सना अधिक मदत करतात
खेळाडूसंघविकेट्ससरासरीषटकेधावासर्वोत्तम गोलंदाजीइकॉनॉमी रेटस्टाइक रेट३ विकेट५ विकेटनिर्धाव
1
Mohammed ShamiMohammed Shami
IND2410482577/57512134
2
Adam ZampaAdam Zampa
AUS2322965154/8525501
3
Dilshan MadushankaDilshan Madushanka
SL2125785255/80622314
4
Jasprit BumrahJasprit Bumrah
IND2018913734/39427209
5
Gerald CoetzeeGerald Coetzee
SA2019633964/44619401
6
Shaheen AfridiShaheen Afridi
PAK1826814815/54527213
7
Marco JansenMarco Jansen
SA1726694503/31624203
8
Ravindra JadejaRavindra Jadeja
IND1624933985/33435114
9
Josh HazlewoodJosh Hazlewood
AUS1628934493/38434108
10
Mitchell SantnerMitchell Santner
NZ1628924495/59434114
11
Mitchell StarcMitchell Starc
AUS1633875283/34632202
12
Haris RaufHaris Rauf
PAK1633795333/43629301
13
Bas de LeedeBas de Leede
NED1630674874/62725200
14
Keshav MaharajKeshav Maharaj
SA1524893704/46435101
15
Kuldeep YadavKuldeep Yadav
IND1528954242/7438002

बातम्या

विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारे FAQ

विश्वचषकात सर्वाधिकवेळा ५ बळी घेणारे गोलंदाज कोण आहेत?

ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने ३ वेळा विश्वचषकातील एका सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत. तर शाहिद आफ्रिदी, ग्लेन मॅकग्रा, मुस्तफिझूर रहमान, वासबर्ट ड्रेक्स आणि अशंथा डी मेलने प्रत्येकी २ वेळा वर्ल्डकपच्या एका सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत.

२०२३ च्या विश्वचषकात भारताचे वेगवान गोलंदाजीचे संयोजन काय असेल?

भारताच्या वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे शीर्ष तीन वेगवान गोलंदाज असतील अशी अपेक्षा आहे.

भारतीय गोलंदाजाने विश्वचषकात हॅट्ट्रिक घेतली आहे का?

दोन भारतीय गोलंदाजांनी विश्वचषकात हॅट्ट्रिक केली आहे - चेतन शर्मा १९८७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि मोहम्मद शमी २०१९ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध.

कोणत्या भारतीय गोलंदाजाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत?

भारताचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांनी वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी ४४ विकेट्स घेतल्या आहेत.

विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या आहेत?

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स ग्लेन मॅकग्राने घेतल्या आहेत. तो ३९ सामन्यांत ७१ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे.