Australian Media Anger on India : क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये भारताचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवत विक्रमी सहाव्यांदा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपचे जेतेपद मिळवले. तर भारताचे वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.
या विजयानंतर ऑस्ट्रेलिय कर्धणार पॅट कमिन्सचे प्रचंड कौतुक होत आहे. कारण त्याने सामन्याच्या एकदिवस आधीच मैदानातील भारतीय चाहत्यांना शांत करण्यास मजा येईल, असे विधान केले होते आणि ते त्याने सिद्ध करून दाखवले.
वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला आणि पॅट कमिन्सला समाधान मिळाले असेल, पण ऑस्ट्रेलियन मीडियाला विश्वचषक जिंकूनही समाधान मिळताना दिसत नाही. कारण ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतावर रोष व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, ज्या ऑस्ट्रेलिनय प्रसारमाध्यमांनी भारताच्या उत्कृष्ट स्पर्धा आयोजनाचे, स्वागत आणि व्यवस्थापनाचे आभार कौतुक केले पाहिजे, त्याऐवजी ते भारतावर राग काढत आहेत.
वास्तविक, वर्ल्डकप फायनलनंतर म्हणजेच सोमवारी (२० नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाच्या अनेक वृत्तपत्रांमध्ये कांगारू संघाचे जोरदार कौतुक केले गेले. पण यासोबत ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी भारतावरही जोरदार टीका केली आहे.
सामन्यानंतर जेव्हा पॅट कमिन्सला ट्रॉफी प्रदान करण्यात आली, त्यावेळी खचाखच भरलेले मैदान रिकामे दिसत होते. हे पाहून ऑस्ट्रेलियन मीडियाला वेदना होत आहेत. त्यांचा कर्णधार पॅट कमिन्सने रिकाम्या मैदानात ट्रॉफी उंचावली, हे तेथील प्रसारमाध्यमांमध्ये आवडले नाही. या अशा गोष्टींवरून भारतावर टीका होत आहे.
‘द क्रॉनिकल’ने दावा केला आहे की, “क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीयांनी खिलाडूवृत्ती दाखवली नाही, त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाची ट्रॉफी दिली जात असताना भारतीय खेळाडूंचे वर्तन दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते. सर्व सामने जिंकल्यानंतर फायनलमधील पराभव पचवणे टीम इंडियाला अवघड गेले. कारण ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला आणि यामुळे कोट्यवधी भारतीयांची मने दुखावली गेली.
'हेराल्ड सन'ने रिकी पाँटिंगच्या हवाल्याने लिहिले आहे की, भारताने तयार केलेली खेळपट्टी भारतावरच उलटली. अंतिम सामन्यात नवीन खेळपट्टी नव्हती. ही तीच खेळपट्टी होती ज्यावर भारताने गेल्या महिन्यात साखळी सामन्यात पाकिस्तानचा पराभव होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही सामन्याच्या एक दिवस आधी पीचबाबत चिंता व्यक्त केली होती.
यानंतर टेलिग्राफने हेडिंग दिले आहे की, "भारताचे मुखवटा समोर आला आहे, अनेक दशकांपासून सुरू असलेली निराशा अजूनही कायम आहे. या वृत्तपत्राने पुढे लिहिले की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक तर शांत झालेच, शिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी १४० कोटी भारतीयांना गप्प केले आणि विश्वचषक जिंकला.
ऑस्ट्रेलियन वेबसाइट द एजने अशी हेडलाइन दिली आहे, स्टेडियममधील प्रेक्षकांची शांतता कमिन्स संघासाठी सुवर्णकाळ आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, “स्टेडियममध्ये ९० हजारांहून अधिक लोक होते. पण जेव्हा कमिन्सने विराट कोहलीचा स्टंप उडवला त्यावेळी मैदानात केवळ ऑस्ट्रेलियाच्या ११ खेळाडूंचा गोंगाट सुरू होता.
सोबतच, ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्रांनी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाचे जोरदार कौतुक केले आहे. त्यांनी कमिन्सला एक चांगला नेता संबोधले आहे.
दरम्यान, क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर म्हणजेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडियाने कांगारूंसमोर २४१ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंनी संयम दाखवत हे लक्ष्य ४३व्या षटकात ३ गडी गमावून गाठले. या विजयामुळे भारताचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले असतानाच ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन बनला.