मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat-Anushka Bodyguard : विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डला बघितलंय का? पगाराचा आकडा पाहून चक्कर येईल

Virat-Anushka Bodyguard : विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डला बघितलंय का? पगाराचा आकडा पाहून चक्कर येईल

Jan 23, 2023, 05:40 PM IST

    • Virat - Anushka Bodyguard : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या अंगरक्षकाचा पगार ऐकून कोणालाही धक्का बसेल. त्याला जितका पगार मिळतो तितका पगार काही कंपन्यांच्या सीईओलाही मिळत नाही.
Virat - Anushka Bodyguard

Virat - Anushka Bodyguard : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या अंगरक्षकाचा पगार ऐकून कोणालाही धक्का बसेल. त्याला जितका पगार मिळतो तितका पगार काही कंपन्यांच्या सीईओलाही मिळत नाही.

    • Virat - Anushka Bodyguard : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या अंगरक्षकाचा पगार ऐकून कोणालाही धक्का बसेल. त्याला जितका पगार मिळतो तितका पगार काही कंपन्यांच्या सीईओलाही मिळत नाही.

भारतीय सेलिब्रेटी आपल्या सुरक्षेची नेहमीच खूप काळजी घेतात. ते आपल्या सुरक्षेवर मोठा खर्चदेखील करतात. अलीकडेच विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या बॉडीगार्ड्च्या पगाराचा मुद्दा समोर आला आहे. बॉलीवूड स्टार अनुष्का शर्माने स्टार क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केले होते. अनुष्काचा वैयक्तिक अंगरक्षक प्रकाश सिंग उर्फ ​​सोनू सध्या चर्चेत आहे. सोनू नेहमीच सावलीप्रमाणे अनुष्का शर्माला फॉलो करतो. अनुष्काला संरक्षण देण्यासाठी सोनूला मोठा पगारदेखील मिळतो.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

एका वेबसाईटनुसार, प्रकाश सिंह उर्फ ​​सोनूचा वार्षिक पगार सुमारे १.२ कोटी रुपये आहे. याचा अर्थ सोनूचा पगार अनेक कंपन्यांच्या सीईओंच्या सीटीसीपेक्षा जास्त आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी सोनू त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. अनुष्का दरवर्षी सोनूचा वाढदिवसदेखील साजरा करते. झिरोच्या सेटवरही सोनूचा वाढदिवस साजर करण्याता आला होता. त्यावेळीदेखील सोनू चर्चेत आला होता.

केवळ अनुष्काच नाही तर सोनू विराट कोहलीलादेखील अनेक वेळा संरक्षण देतो, अनेक वेळा विराटचे सुरक्षा रक्षक नसताना सोनू त्याच्या सोबत दिसला आहे. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अभिनेत्री अनुष्का शर्मा आई होणार होती, तेव्हाही सोनूने अनुष्काचे सर्वोत्तम प्रकारे संरक्षण केले.

विराट आणि अनुष्काचे २०१७ मध्ये लग्न

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माने २०१७ मध्ये लग्न केले. २०२१ मध्ये विराट आणि अनुष्काला मुलगी झाली, तिचे नाव वामिका आहे. नुकतेच विराट आणि अनुष्का वृंदावनला गेले होते, त्या ठिकाणी दोघांनी बाबा नीम करौली यांच्या समाधीचेही दर्शन घेतले होते.