मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli: क्विक सिंगल घेतल्यानंतर विराटनं छाती पकडली, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Virat Kohli: क्विक सिंगल घेतल्यानंतर विराटनं छाती पकडली, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Nov 07, 2022, 10:43 AM IST

    • virat kohli fitness t20 world cup 2022: विराट कोहली धावून रन्स काढण्यात एक्सपर्ट आहे. तो खेळपट्टीवर वेगाने धावतो, पण तोदेखील एक माणूस आहे आणि म्हणूनच झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना चाहत्यांना एक धक्का देणारी गोष्ट पाहायला मिळाली. झटपट सिंगल घेतल्यानंतर विराट आपली छाती रब करताना दिसला आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता.
Virat Kohli

virat kohli fitness t20 world cup 2022: विराट कोहली धावून रन्स काढण्यात एक्सपर्ट आहे. तो खेळपट्टीवर वेगाने धावतो, पण तोदेखील एक माणूस आहे आणि म्हणूनच झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना चाहत्यांना एक धक्का देणारी गोष्ट पाहायला मिळाली. झटपट सिंगल घेतल्यानंतर विराट आपली छाती रब करताना दिसला आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता.

    • virat kohli fitness t20 world cup 2022: विराट कोहली धावून रन्स काढण्यात एक्सपर्ट आहे. तो खेळपट्टीवर वेगाने धावतो, पण तोदेखील एक माणूस आहे आणि म्हणूनच झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना चाहत्यांना एक धक्का देणारी गोष्ट पाहायला मिळाली. झटपट सिंगल घेतल्यानंतर विराट आपली छाती रब करताना दिसला आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता.

T20 विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. या स्पर्धेत भारतीय फलंदाज विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. तसेच, तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूदेखील आहे. त्याच्यामुळे टीम इंडियाने ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान मिळवले. काल (६ नोव्हेंबर) भारताने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आपला शेवटचा ग्रुप सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळला. या सामन्यात भारत विजयी झाला. मात्र, सामन्यादरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली, जी विराट कोहलीशी संबंधित आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

वास्तविक, विराटने झिम्बाब्वेविरुद्ध २५ चेंडूत २६ धावांची खेळी केली. मात्र, या दरम्यान विराटने एक क्विक सिंगल घेतल्यानंतर त्याने आपल्या छातीला हात लावल्याचे दिसले, तो काही क्षण तसाच होता. विशेष म्हणजे विराटने शनिवारीच (५ नोव्हेंबर) वयाची ३४ वर्षे पूर्ण केली आहेत. तसेच, विराट कोहलीच्या फिटनेसवर कोणीही प्रश्न उपस्थित करु शकत नाही, परंतु झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान तो थोडा अस्वस्थ दिसत होता. मात्र, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

विराट कोहली धावून रन्स काढण्यात एक्सपर्ट आहे. तो खेळपट्टीवर वेगाने धावतो, पण विराट देखील एक माणूस आहे आणि म्हणूनच झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना चाहत्यांना ही थोडीशी धक्का देणारी गोष्ट पाहायला मिळाली. झटपट सिंगल घेतल्यानंतर तो छाती रब करताना दिसला आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून चाहते थोडेसे चिंतेत पडले, पण विराट पटकन पुन्हा सामान्य स्थितीत आला. त्यानंतर त्याच्यातील ऊर्जा कमी झाली नाही. तुम्हीदेखील हे व्हिडिओत पाहू शकता.

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीदेखील कॉमेंट्रीमध्ये सांगितले की, दुसरी धाव नेहमीच कठीण असते. तसेच, विराट विकेट्सच्या दरम्यान खूप वेगाने धावतो. नेहमी अतिरिक्त धावांच्या शोधात असतो. तुम्ही पाहू शकता की ज्या क्षणी त्याने हा चेंडू खेळला, तेव्हा त्याला माहित होते की क्षेत्ररक्षक कुठे आहे आणि त्याला हेदेखील माहीत होते की तो दुसरा रन घेऊ शकतो. पण घेतला नाही. आता त्यानंतर तो आपला मिळवण्याचा प्रयत्न करत आहे'.

पुढील बातम्या