IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज एमएस धोनीने स्फोटक फलंदाजी आणि त्याच्या आयकॉनिक हेअर स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शनिवारी धोनी पुन्हा एकदा नव्या लूकमध्ये दिसला, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चेन्नई सुपरकिंग्जने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून धोनीच्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे.
आपल्या आयकॉनिक हेअरस्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी आपला लूक बदलला आहे. सीएसकेने धोनीच्या नव्या लूकला 'समुराई' असे नाव दिले आहे. धोनीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धोनीच्या यंदाच्या आयपीएलमध्ये स्फोटक अशी फलंदाजी केली. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आणि कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर धोनीने उल्लेखनीय सातत्य दाखवत आपले ट्रेडमार्क फिनिशिंग कौशल्य दाखवले आहे.
नुकत्याच झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने १६ चेंडूत ३७ धावांची धमाकेदार खेळी केली. मात्र, या सामन्यात चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने वेगळ्या पद्धतीने षटकार मारण्याचे कौशल्य दाखविल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीवर धोनीने अवघ्या ४चेंडूत २० धावा ठोकल्या, ज्यात सलग तीन षटकारांच समावेश होता. या सामन्यात चेन्नईच्या संघाने २० धावांनी विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामन्यात धोनीने ९ चेंडूत २८ धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १६ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी करत चार चौकार आणि तीन षटकार ठोकले.
चेन्नई सुपर किंग्जने मागील दोन सामन्यात खराब कामगिरी केली. लखनौ सुपर जायंट्स (परदेशात आणि मायदेशात) विरुद्ध सलग पराभवाला सामोरे जावे लागले. रविवारी रात्री सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना त्यांना आणखी एका कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. एलएसजीविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नई सुपरकिंग्ज अव्वल चारमधून बाहेर पडला आहे. पॅट कमिन्सच्या संघावर विजय मिळवून प्लेऑफच्या शर्यतीत पुनरागमन करण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल.