मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli Video: विराटच्या हॉटेल रुममधील UNSEEN व्हिडीओ व्हायरल, प्रायव्हसीवरून कोहली संतापला

Virat Kohli Video: विराटच्या हॉटेल रुममधील UNSEEN व्हिडीओ व्हायरल, प्रायव्हसीवरून कोहली संतापला

Oct 31, 2022, 11:47 AM IST

  • Virat Kohli unseen Hotel Room Video: टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहलीच्या हॉटेल रुममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ विराटला न सांगता व्हायरल करण्यात आला आहे. यानंतर त्याने स्वत: तो व्हायरल व्हिडीओ पोस्ट करुन संताप व्यक्त केला आहे. प्रत्येकाच्या प्रायव्हसीचा आदर केला पाहिजे, असे विराटचे म्हणणे आहे.

Virat Kohli Hotel Room Video

Virat Kohli unseen Hotel Room Video: टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहलीच्या हॉटेल रुममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ विराटला न सांगता व्हायरल करण्यात आला आहे. यानंतर त्याने स्वत: तो व्हायरल व्हिडीओ पोस्ट करुन संताप व्यक्त केला आहे. प्रत्येकाच्या प्रायव्हसीचा आदर केला पाहिजे, असे विराटचे म्हणणे आहे.

  • Virat Kohli unseen Hotel Room Video: टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहलीच्या हॉटेल रुममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ विराटला न सांगता व्हायरल करण्यात आला आहे. यानंतर त्याने स्वत: तो व्हायरल व्हिडीओ पोस्ट करुन संताप व्यक्त केला आहे. प्रत्येकाच्या प्रायव्हसीचा आदर केला पाहिजे, असे विराटचे म्हणणे आहे.

टी-20 विश्वचषकात भारताला रविवारी पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. पर्थ येथे दक्षिण आफ्रिकेने भारताचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ ग्रुप २ मधील गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे. भारताचे ग्रुप स्टेजमध्ये आणखी २ सामने बाकी आहे. तसेच, सेमी फानलमध्ये सहज प्रवेश करायचा असेल तर भारताला हे दोन्ही सामने जिंकावे लागतील.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही त्याच्या हॉटेल रुमचे दर्शन घेऊ शकता. तसेच, विराटच्या रुममध्ये काय-काय वस्तू आहेत, तेदेखील पाहू शकता. त्याच्या बाथरुमपासून ते हॉटेल रूममधील कपाटात काय आहे? ते सर्व या व्हिडीओत पाहू शकता.

विराटने व्यक्त केला संताप

खरंतर विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा हा UNSEEN व्हिडिओ त्याच्या नकळत सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ पाहून विराटला आपला राग आनावर झाला. त्यानंतर विराटने स्वतः हा व्हिडीओ इन्स्टाग्रावर शेअर करत कॅप्शनमध्ये आपला राग व्यक्त केला आहे. विराटचे असे मत आहे की, असे व्हिडिओ त्याच्या प्रायव्हसीचे उल्लंघन करतात.

वास्तविक, भारतीय क्रिकेट संघ सध्या पर्थमध्ये आहे. हा व्हिडिओदेखील पर्थच्या हॉटेल रुममधील असल्याचे मानले जात आहे.

विराटनं इन्स्टाग्रामवर काय लिहिलं

विराट कोहलीने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, 'मी समजू शकतो की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला पाहून आनंदी आणि उत्साहित होतात आणि त्यांना भेटण्यासाठीही नेहमीच उत्सुक असतात. मी नेहमीच याचे कौतुक केले आहे. पण हा व्हिडीओ मला घाबरवणारा आहे. कारण हे पाहून मला माझ्या प्रायव्हसीबाबत चिंता होत आहे. जर मला माझ्या स्वतःच्या हॉटेलच्या खोलीत प्रायव्हसी मिळत नसेल, तर मी इतरत्र प्रायव्हसीची अपेक्षा कशी करू शकतो? मी अशा घटनांना योग्य मानत नाही, हे माझ्या प्रायव्हसीचे पूर्णपणे उल्लंघन आहे. कृपया लोकांच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि कुणालाही मनोरंजनाचे साधन समजू नका.'

पुढील बातम्या