इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज चेन्नई सुपर किग्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने हैदराबादचा ७८ धावांनी पराभव केला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK ने २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ १८.५ षटकांत १३४ धावा करून सर्वबाद झाला. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने ९८ धावांची शानदार खेळी केली. डॅरिल मिशेलने ५२ धावा केल्या. शिवम दुबे ३९ धावा करून नाबाद राहिला.
चेन्नईने दिलेल्या २१३ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला हैदराबादचा संघ १३४ धावा करून सर्वबाद झाला. त्यासाठी मार्करामने ३२ धावांची खेळी खेळली. क्लासेनने २० धावा केल्या. यादरम्यान चेन्नईकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडेने ४ बळी घेतले. पाथीराना आणि मुस्तफिझूरने २-२ विकेट घेतल्या. जडेजा आणि शार्दुलने १-१ विकेट घेतली.
या विजयासह चेन्नई संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. या संघाने सहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत.
दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्सला पराभवानंतर मोठा फटका बसला आहे. हा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. सनरायझर्स संघाने आतापर्यंत ९ पैकी ५े सामने जिंकले आहेत.
वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने एडन मार्करामच्या गोलंदाजीवर हैदराबादला पाचवा धक्का दिला. मार्कराम २६ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. हैदराबादचा डाव गडगडला असून त्याने ८५ धावांत ५ विकेट गमावल्या आहेत. हैदराबादला विजयासाठी अजूनही ५५ चेंडूत १२८ धावांची गरज आहे. अब्दुल समद सध्या हेनरिक क्लासेनसोबत क्रीजवर आहे.
वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने ट्रॅव्हिस हेडला बाद करून हैदराबादला पहिला धक्का दिला. ट्रॅव्हिस हेड ७ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. हेड बाद झाल्यानंतर अनमोलप्रीत सिंग इम्पॅक्ट प्लेयर म्हणून क्रीजवर आला.
चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी २१३ धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २१२ धावा केल्या. ऋतुराजने स्फोटक खेळी खेळली. त्याने ५४ चेंडूत ९८ धावा केल्या. यादरम्यान त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले. डॅरिल मिशेलने ५२ धावांची खेळी केली. शिवम दुबे २० चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. त्याने ४ षटकार आणि १ चौकार लगावला. धोनीने नाबाद ५ धावा केल्या.
हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, नटराजन आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सलग दुसरे शतक झळकावू शकला नाही आणि ९८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. टी नटराजनने गायकवाडला बाद करत शिवम दुबेसोबत तिसऱ्या विकेटसाठी केलेली मोठी भागीदारी तोडली. ऋतुराज बाद झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी क्रिजवर आला आहे.
वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने शानदार खेळी खेळणाऱ्या डॅरिल मिशेलला बाद करत हैदराबादला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यासह मिशेल आणि गायकवाड याच्यातील दुसऱ्या विकेटसाठीची शतकी भागीदारी संपुष्टात आली. मिशेल ३२ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. आता शिवम दुबे कर्णधार गायकवाडला सपोर्ट करण्यासाठी क्रीझवर आला आहे.
सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यानंतर डॅरिल मिशेलनेही अर्धशतक झळकावले आहे. गायकवाड आणि मिशेल यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठीची शतकी भागीदारीही पूर्ण झाली आहे. सीएसकेच्या १३ षटकात १ बाद १२३ धावा झाल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा कर्णधारपदाची खेळी खेळली आणि हैदराबादविरुद्ध अर्धशतक झळकावले. गायकवाडचे या मोसमातील हे तिसरे अर्धशतक आहे. ९ षटकांच्या अखेरीस एका विकेटवर ८२ धावा केल्या. गायकवाड २७ चेंडूत ५१ धावांवर तर मिशेल १५ चेंडूत २० धावा करून क्रीजवर आहे.
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सलामीवीर अजिंक्य रहाणेला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. रहाणेने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण सीमारेषेवर उभा असलेल्या शाहबाज अहमदने त्याचा झेल घेतला. रहाणेने १२ चेंडूत ९ धावा केल्या.
रहाणे बाद झाल्यानंतर डॅरिल मिशेल आला आहे. चेन्नईने ३ षटकांअखेर एका विकेटच्या मोबदल्यात १९ धावा केल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन.
इम्पॅक्ट सब: उमरान मलिक, मयंक मार्कंडे, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर.
चेन्नई सुपर किंग्ज : अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथिराना.
इम्पॅक्ट सब: समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने या सामन्यासाठी मयंक मार्कंडेला प्लेइंग-११ मधून बाहेर ठेवले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध एकूण २० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये सीएसकेने १४ सामने जिंकले असून हैदराबाद संघाने ६ सामने जिंकले आहेत. याआधी दोन्ही संघ ५ एप्रिल २०२४ रोजी आमनेसामने आले होते. त्या सामन्यात १६६ धावांचा पाठलाग करताना हैदराबादने १८.१ षटकात सामना जिंकला होता.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला आहे. चेंडू थांबून बॅटवर येतो त्यामुळे फलंदाजांना खूप संघर्ष करावा लागतो. एम चिदंबरम स्टेडियममध्ये एकूण ११० सामने झाले आहेत. तर या मैदानावर एकूण ७६ आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये यजमान संघाने ५१ सामने जिंकले आहेत, तर पाहुण्या संघाने २५ सामने जिंकले आहेत.
CSK चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चालू मोसमात ४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये CSK ने ३ सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबादसाठी आजचा सामना सोपा असणार नाही.