मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli: 'बाबा जी की जय हो', वृंदावनहून परतताच विराटनं शतक ठोकलं; हे भन्नाट मीम्स एकदा बघाच!

Virat Kohli: 'बाबा जी की जय हो', वृंदावनहून परतताच विराटनं शतक ठोकलं; हे भन्नाट मीम्स एकदा बघाच!

Jan 10, 2023, 09:07 PM IST

    • virat kohli & baba nim karoli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. विराट कोहलीने ११३ धावांची इनिंग खेळली, ज्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Virat Kohli

virat kohli & baba nim karoli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. विराट कोहलीने ११३ धावांची इनिंग खेळली, ज्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

    • virat kohli & baba nim karoli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. विराट कोहलीने ११३ धावांची इनिंग खेळली, ज्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

India vs Sri Lanka (IND vs SL) 1st ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर ३७४धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

या सामन्यात विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक ११३ धावा केल्या. विराटने ८० चेंडूत आपल्या वनडे करिअरमधले ४५वे शतक साकारले. त्याने ८७ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकारासह या ११३ धावा केल्या.

प्रत्युत्तरात श्रीलंकेची अवस्था बिकट झाली आहे. हे वृत्त लिहिपर्यंत श्रीलंकेच्या ४४ षटकात ८ बाद २५६ धावा झाल्या आहेत.

विराटने शतक केल्यानंतर त्याचे भलतेच खूश झाले आहेत. चाहत्यांनी विराटच्या खेळीचा संबंध वृंदावन भेटीशी जोडला आहे.

या मालिकेपूर्वी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत वृंदावनला गेला होता, तिथे त्याने नीम करौली बाबाच्या आश्रमाला भेट दिली होती. येथून परतल्यानंतर विराट कोहलीने शतक झळकावले.

याबाबत ट्विटरवर चाहत्यांच्या अप्रतिम प्रतिक्रिया आल्या आहेत. काही चाहत्यांनी लिहिले की विराट कोहलीनंतर आता रोहित शर्मा, केएल राहुल, शुभमन गिल यांनाही बाबा नीम करौली यांच्या आश्रमात जायला आवडेल. काही मीम्स देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये शिखर धवन आणि पृथ्वी शॉ, जे संघाबाहेर आहेत, ते खेळाडू तिथे जाण्याचा प्लॅन बनवत चर्चा करत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपली मुलगी विरुष्कासोबत वृंदावनला पोहोचला होता. येथे त्यांनी आश्रमाला भेट दिली. या तिघांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये सर्वजण आश्रमात बसलेले दिसत होते.

पुढील बातम्या