मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND VS NZ: भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; विल्यमसन कॅप्टन नसणार, ‘या’ दिवशी पहिला सामना

IND VS NZ: भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; विल्यमसन कॅप्टन नसणार, ‘या’ दिवशी पहिला सामना

Jan 13, 2023, 10:34 AM IST

    • New Zealand T20 Squad For India Series : भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यीय संघात कर्णधार केन विल्यमसन आणि टीम साऊथीचा समावेश करण्यात आलेला नाही. दोघांना विश्रांती देण्यात आली आहे.
New Zealand T20 Squad For India Series

New Zealand T20 Squad For India Series : भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यीय संघात कर्णधार केन विल्यमसन आणि टीम साऊथीचा समावेश करण्यात आलेला नाही. दोघांना विश्रांती देण्यात आली आहे.

    • New Zealand T20 Squad For India Series : भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यीय संघात कर्णधार केन विल्यमसन आणि टीम साऊथीचा समावेश करण्यात आलेला नाही. दोघांना विश्रांती देण्यात आली आहे.

New Zealand T20 team For India Series : भारताविरुद्धच्या ३ टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. १५ सदस्यीय संघात कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथी यांचा समावेश नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. केन विल्यमसन आणि टीम साऊदी यांच्या अनुपस्थितीत संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मिचेल सँटनरने अप्रतिम खेळ दाखवला होता. २७ जानेवारीपासून ३ टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

या मालिकेसाठी डावखुरा मध्यमगती गोलंदाज बेन लिस्टर आणि हेन्री शिपली यांची संघात निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी फिरकी अष्टपैलू मायकेल रिप्पनलाही संघात स्थान मिळाले आहे. रिप्पनने गेल्या वर्षीच्या युरोपियन दौऱ्यावर स्कॉटलंडविरुद्ध पदार्पण केले होते, त्यानंतर तो संघाबाहेर होता.

तर काइल जेमिसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने आणि बेन सियर्स हे दुखापतीमुळे टी-20 मालिकेत निवडीसाठी उपलब्ध नव्हते.

भारताविरुद्धच्या T20I मालिकेसाठी न्यूझीलंड संघ:

मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिपन, हेन्री शिपले , ईश सोधी , ब्लेअर टिकनर.

भारत-न्यूझीलंड मालिका (संपूर्ण वेळापत्रक):

वनडे मालिका

पहिला एकदिवसीय - १८ जानेवारी, हैदराबाद

दुसरी वनडे - २१ जानेवारी, रायपूर

तिसरी एकदिवसीय - २४ जानेवारी, इंदूर

टी-२० मालिका

पहिला T20 - २७ जानेवारी, रांची

दुसरा T20 - २९ जानेवारी, लखनौ

तिसरा T20 - १ फेब्रुवारी, अहमदाबाद