मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WATCH: सर्वांची धुलाई करणारा शनाका कुलदीपच्या जाळ्यात अडकला, अशी केली दांडी गुल

WATCH: सर्वांची धुलाई करणारा शनाका कुलदीपच्या जाळ्यात अडकला, अशी केली दांडी गुल

Jan 12, 2023, 07:48 PM IST

    • Kuldeep Yadav vs Dasun Shanaka: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करताना ३ बळी घेतले. यामध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाची विकेट खूपच खास होती. शनाकाने टी-२० मालिकेत आणि पहिल्या वनडेत सर्व भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. पण कुलदीपने त्याला सहज आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.
shanaka vs kuldeep

Kuldeep Yadav vs Dasun Shanaka: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करताना ३ बळी घेतले. यामध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाची विकेट खूपच खास होती. शनाकाने टी-२० मालिकेत आणि पहिल्या वनडेत सर्व भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. पण कुलदीपने त्याला सहज आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

    • Kuldeep Yadav vs Dasun Shanaka: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करताना ३ बळी घेतले. यामध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाची विकेट खूपच खास होती. शनाकाने टी-२० मालिकेत आणि पहिल्या वनडेत सर्व भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. पण कुलदीपने त्याला सहज आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

India Vs Sri Lanka 2nd ODI Match highlights: कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. विशेषत: कुलदीप यादवने आपल्या फिरकी गोलंदाजीची जादू दाखवली. या डावखुऱ्या गोलंदाजाने १० षटकांत ५१ धावा देत ३ बळी घेतले. त्याच्या गोलंदाजीच्या बळावरच भारताने श्रीलंकेला २१५ धावांत गुंडाळले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

कुलदीप यादवने घेतलेल्या तीन विकेटमध्ये दासून शनाकाची विकेट खास होती. ४ विकेट पडल्यानंतर क्रीझवर आलेल्या शनाकाने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण कुलदीपच्या एका चेंडूवर तो फसला आणि क्लीन बोल्ड झाला. कुलदीपने शनाकाला लेगस्टंपवर चेंडू टाकला. या चेंडूवर शनाका स्वीपवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात होता. पण कुलदीपचा चेंडू जास्त टर्न झाला नाही, तो सरळ गेला आणि शनाकाची दांडी गुल केली.

श्रीलंकेच्या २१५ धावा

दरम्यान, सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांची सुरुवातही चांगली झाली. श्रीलंकेच्या टॉपऑर्डरने १६ षटकात १ बाद १०२ धावा केल्या होत्या. मात्र, वन डाऊनला आलेला कुसल मेंडीस बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. त्यानंतर त्यांचा डाव सावरू शकला नाही.

श्रीलंकेकडून पदार्पण करणाऱ्या नुवानिंदू फर्नांडोने सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याच्याशिवाय कुशल मेंडिसने ३४ आणि दुनिथ वेलाल्गेने ३२ धावांचे योगदान दिले.

तर भारताकडून कुलदीप आणि सिराजने प्रत्येकी ३ विकेट घेतले तर उमरान मलिकने दोन बळी घेतले. अक्षर पटेलला एक विकेट मिळाला. टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास त्यांची मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी होईल.

कुलदीपच्या २०० विकेट्स पूर्ण

२८ वर्षीय कुलदीप यादवला खेळण्याच्या सतत संधी मिळत नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये आर. अश्विन आणि रवींद्र जडेजामुळे त्याला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळत नाही. त्याचबरोबर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चहल, सुंदर आणि अक्षर पटेलसारखे फिरकीपटू संघाची पहिली पसंती म्हणून पुढे आले आहेत. कुलदीप यादवने आतापर्यंत भारतासाठी ८ कसोटी, ७४ एकदिवसीय आणि २५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर २०० विकेट्स आहेत.

पुढील बातम्या