मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SL 2nd ODI Highlights: भारतानं वनडे मालिका जिंकली, केएल राहुलनं केला चमत्कार

IND vs SL 2nd ODI Highlights: भारतानं वनडे मालिका जिंकली, केएल राहुलनं केला चमत्कार

Jan 12, 2023, 08:53 PM IST

    • India beat Sri Lanka 2nd odi: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ४ गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
IND vs SL Highlights

India beat Sri Lanka 2nd odi: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ४ गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

    • India beat Sri Lanka 2nd odi: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ४ गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

India Vs Sri Lanka 2nd ODI Match highlight: भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ४ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह त्याने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला तो केएल राहुल, त्याने नाबाद अर्धशतक झळकावले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

श्रीलंकेने भारताला विजयासाठी २१६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४३.२ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात २१९ धावा करत सामना जिंकला. भारताकडून केएल राहुलने नाबाद ६४ धावांची खेळी केली. केएल राहुलने १०३ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार लगावले. राहुलशिवाय हार्दिक पांड्याने ३६ आणि श्रेयस अय्यरने २८ धावा केल्या.

रोहित-विराट फ्लॉप

२१५ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. ८६ धावांत भारताचे ४ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. कर्णधार रोहित शर्मा १७, शुभमन गिल २१, विराट कोहली ४ आणि श्रेयस अय्यर २८ धावा करून बाद झाले. त्यानंतर राहुलने डावाची सुत्रे हाती घेतली आणि जबाबदारीने फलंदाजी केली. राहुलने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली. हार्दिक ५३ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला.

श्रीलंकेचा डाव

दरम्यान, सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांची सुरुवातही चांगली झाली. श्रीलंकेच्या टॉपऑर्डरने १६ षटकात १ बाद १०२ धावा केल्या होत्या. मात्र, वन डाऊनला आलेला कुसल मेंडीस बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. त्यानंतर त्यांचा डाव सावरू शकला नाही.

श्रीलंकेकडून पदार्पण करणाऱ्या नुवानिंदू फर्नांडोने सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याच्याशिवाय कुशल मेंडिसने ३४ आणि दुनिथ वेलाल्गेने ३२ धावांचे योगदान दिले.

तर भारताकडून कुलदीप आणि सिराजने प्रत्येकी ३ विकेट घेतले तर उमरान मलिकने दोन बळी घेतले. अक्षर पटेलला एक विकेट मिळाला.

 

पुढील बातम्या