मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hockey World Cup 2023: १७ दिवस चालणार हॉकी वर्ल्डकपचा थरार, टीम इंडियाचे सामने ‘या’ चॅनलवर दिसणार

Hockey World Cup 2023: १७ दिवस चालणार हॉकी वर्ल्डकपचा थरार, टीम इंडियाचे सामने ‘या’ चॅनलवर दिसणार

Jan 12, 2023, 07:26 PM IST

    • Hockey World Cup 2023 india schedule: १३ जानेवारी पासून हॉकी वर्ल्डकपच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना १३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात भारत स्पेनला भिडणार आहे.
hockey world cup 2023 india team

Hockey World Cup 2023 india schedule: १३ जानेवारी पासून हॉकी वर्ल्डकपच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना १३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात भारत स्पेनला भिडणार आहे.

    • Hockey World Cup 2023 india schedule: १३ जानेवारी पासून हॉकी वर्ल्डकपच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना १३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात भारत स्पेनला भिडणार आहे.

Hockey World Cup Live Streaming Channel: हॉकी विश्वचषक २०२३ ला शुक्रवारपासून (१३ जानेवारी) सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा भारताच्या यजमानपदी खेळवली जाणार आहे. मायदेशात होत असलेल्या या स्पर्धेमुळे भारतीय संघाला दुसरे जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी असेल. यापूर्वी टीम इंडियाने १९७५ मध्ये हॉकी वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपमधील सर्व सामने ओडिशाच्या भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर होणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

राउरकेला येथे एकूण २० सामने खेळवले जाणार आहेत. तर, कलिंगा स्टेडियमवर उर्वरित २४ सामने होणार आहेत. यजमान भारताला स्पेन, इंग्लंड आणि वेल्ससह पूल डी मध्ये ठेवण्यात आले आहे.

हॉकी विश्वचषक स्पर्धेत एकूण १६ देश सहभागी होत आहेत. सहभागी राष्ट्रांची प्रत्येकी ४ संघांच्या ४ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

वर्ल्डकपमधील गट आणि संघ

गटसंघ
अ गट ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका
ब गट बेल्जियम, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि जपान
सी गट नेदरलँडसह न्यूझीलंड, मलेशिया आणि चिली
डी गट भारत, स्पेन, इंग्लंड आणि वेल्स

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघ दुस-यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. १९९७५ मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया अजूनही जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे.

भारत १३ जानेवारीला स्पेनविरुद्ध हॉकी विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. याआधीच्या म्हणजेच, २०१८ च्या वर्ल्डकपमध्ये भारत उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सविरुद्ध २-१ ने पराभूत झाला होता.

हॉकी विश्वचषक कधी आणि किती दिवस खेळवला जाईल?

कटक येथे बुधवारी (११ जानेवारी) हॉकी विश्वचषकाचे उद्घाटन झाले. १३ जानेवारीपासून (शुक्रवार) लढती सुरू होणार आहेत. अंतिम सामना २९ जानेवारीला होणार आहे.

हॉकी विश्वचषक कुठे खेळवला जाईल?

हॉकी विश्वचषकाचे सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळवले जातील.

हॉकी विश्वचषकाचे सामने कोणते टीव्ही चॅनल प्रसारित करेल?

हॉकी विश्वचषकाचे सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जातील. स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये कॉमेंट्रीसह सामने पाहू शकता.

फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी बघायची?

भारतातील हॉटस्टार (डिस्ने+हॉटस्टार) अॅपवर स्पर्धेच्या सामन्यांचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.

ग्रुप स्टेजमधील भारताचे वेळापत्रक

तारिख विरूद्धवेळ 
 १३ जानेवारी स्पेन सायंकाळी ७ वाजता
 १५ जानेवारी इंग्लंड सायंकाळी ७ वाजता
 १९ जानेवारी वेल्स सायंकाळी ७ वाजता

पुढील बातम्या