मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli: गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर विराट कोहलीची इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट

Virat Kohli: गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर विराट कोहलीची इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट

May 09, 2023, 01:42 PM IST

  • Virat Kohli Instagram Post: लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात काल लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा ४३वा सामना खेळला गेला.

Virat Kohli

Virat Kohli Instagram Post: लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात काल लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा ४३वा सामना खेळला गेला.

  • Virat Kohli Instagram Post: लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात काल लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा ४३वा सामना खेळला गेला.

Virat Kohli Vs Gautam Gambhir: लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात काल (०१ मे २०२३) लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा ४३वा सामना खेळला गेला. या सामन्यात बंगळुरूच्या संघाने दिल्लीला पराभवाची धुळ चारली. हा सामना बंगळुरूने १८ धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान आरसीबीचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि एलएसजीचा नवीन-उल-हक हे एकमेकांशी भिडले. लखनौचा मेंटॉर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद पाहायला मिळाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने तिघांनाही दंड ठोठावला. विराट आणि गंभीर यांच्याकडून सामन्याच्या शुल्काच्या १०० टक्के दंड आकारला गेला. तर, नवीन-उल- हकला सामन्याच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला. यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

विराटने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, 'आपण जे काही ऐकतो, ते फक्त ओपिनियन असतं, त्यात काहीच तथ्थ नसतं.' विराट आणि गंभीरचे संबंध कधीच चांगले राहिले नाहीत. आयपीएल २०१३ मध्ये, विराट आरसीबीचा कर्णधार आणि गंभीर कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार असताना, दोघांमध्ये भांडण झाले. याशिवाय, आयपीएलच्या याच मोसमात, जेव्हा आरसीबीचा एलएसजीकडून एम चिन्नास्वामीवर पराभव झाला होता, तेव्हा गीतम गंभीरने स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांना शांत राहण्याचा इशारा दिला होता.

या वादानंतर बीसीसीआयने विराट कोहलीकडून १.०७ कोटीचा दंड वसूल केला आहे. तर, गौतम गंभीरला २५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या वादाची चर्चा सुरू आहेत. नेटकरी दोघांमधील वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत.

विभाग