मराठी बातम्या  /  क्रीडा  /  GT vs DC Head to Head: गुजरात- दिल्लीचा संघ आज एकमेकांशी भिडणार, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

GT vs DC Head to Head: गुजरात- दिल्लीचा संघ आज एकमेकांशी भिडणार, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 02, 2023 10:56 AM IST

IPL 2023: गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज आयपीएल २०२३ मधील ४४वा सामना खेळला जाणार आहे.

GT vs DC
GT vs DC

IPL 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज आयपीएल २०२३ मधील ४४वा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. गुजरातने सहा सामने जिंकले आहेत. तर, दिल्लीच्या संघाला फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. दरम्यान, गुजरात आणि दिल्ली यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात गुजरात आणि दिल्लीचा संघ दोन वेळा आमनेसामने आले. या दोन्ही सामन्यात गुजरातच्या संघाने दिल्लीला पराभवाची धुळ चारली. या हंगामात दुसऱ्यांदा दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघ पहिल्यांदाच नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील.

कधी, कुठे पाहणार सामना?

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हा सामना आज (०२ मे २०२३) संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. त्याच वेळी, या सामन्याचे थेट प्रवाह 'जिओ सिनेमा' अॅपवर उपलब्ध असेल. या अॅपवर तुम्ही हा सामना मोफत पाहू शकता. येथे वेगवेगळ्या भाषांमध्ये सामना पाहता येणार आहे.

गुजरातचा संघ-

वृद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल, शुभमन गिल, श्रीकर भारत, रविश्रीनिवासन साई किशोर, शिवम मावी, जयंत यादव, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल, साई सुदर्शन, यश दयाल.

दिल्लीचा संघ-

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, मुकेश कुमार, सरफराज खान, ललित यादव, अभिषेक पोरेल, खलील अहमद , प्रवीण दुबे, रिली रोसौ, लुंगी एनगिडी, मुस्तफिझूर रहमान, रोवमन पॉवेल, पृथ्वी शॉ, चेतन साकारिया, अमन हकीम खान, यश धुल, विकी ओस्तवाल.

WhatsApp channel

विभाग