मराठी बातम्या  /  क्रीडा  /  LSG vs RCB IPL : लो स्कोरिंग थ्रिलरमध्ये लखनौचा १८ धावांनी पराभव, आरसीबी प्ले ऑफच्या दिशेने

LSG vs RCB IPL : लो स्कोरिंग थ्रिलरमध्ये लखनौचा १८ धावांनी पराभव, आरसीबी प्ले ऑफच्या दिशेने

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 01, 2023 11:55 PM IST

IPL 2023 LSG vs RCB : आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दणदणीत विजय मिळवला. १२७ धावांचे छोटे लक्ष्य दिल्यानंतरही आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सचा १८ धावांनी पराभव केला. बंगळुरूचा ९ सामन्यांमधला हा ५वा विजय आहे. लखनौचा हा ९ सामन्यांमधला चौथा पराभव आहे.

IPL 2023 LSG vs RCB
IPL 2023 LSG vs RCB

IPL 2023 LSG vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने आपला ५वा विजय नोंदवला. सोमवारी (१ मे) लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात RCB ने लखनौ सुपर जायंट्स (LSG) चा १८ धावांनी पराभव केला. बेंगळुरू संघाचे सर्व गोलंदाज आणि त्यांचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे या विजयाचे हिरो ठरले.

ट्रेंडिंग न्यूज

लखनौला सामना जिंकण्यासाठी अवघ्या १२७ धावांचे लक्ष्य होते. त्यांचा कर्णधार केएल राहुल क्षेत्ररक्षणादरम्यान जखमी होऊन बाहेर पडला. सामन्याच्या शेवटी तो फलंदाजीसाठी आला, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अशा स्थितीत लखनौचा संघ केवळ १०८ धावांवर गारद झाला.

या पराभवासह लखनौचा संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांचे नऊ सामन्यांतून पाच विजय आणि चार पराभवांसह १० गुण आहेत. त्याचवेळी बंगळुरूचेही नऊ सामन्यांत पाच विजय आणि चार पराभवांसह १० गुण आहेत. बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

लखनौ संघाकडून कृष्णप्पा गौतमने सर्वाधिक २३ धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. बंगळुरूकडून कर्ण शर्मा आणि जोश हेझलवूडने २-२ बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल आणि वानिंदू हसरंगा यांना १-१ विकेट मिळाला.

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संघाने ९ गडी गमावून १२६ धावा केल्या. बेंगळुरूसाठी कर्णधार डू प्लेसिसने ४० चेंडूत सर्वाधिक ४४ धावा केल्या. त्याच्याशिवाय विराट कोहलीने ३१ धावांची खेळी खेळली. तर दिनेश कार्तिकने १६ धावा केल्या. लखनौच्या नवीन-उल-हकने ३ बळी घेतले. तर अमित मिश्रा आणि रवी बिश्नोई यांनी २-२ विकेट घेतल्या.

WhatsApp channel