मराठी बातम्या  /  क्रीडा  /  GT vs SRH IPL 2023 : आयपीएलमध्ये आज गुजरात आणि हैदराबादमध्ये रंगणार सामना, कोण मारणार बाजी?

GT vs SRH IPL 2023 : आयपीएलमध्ये आज गुजरात आणि हैदराबादमध्ये रंगणार सामना, कोण मारणार बाजी?

May 15, 2023, 09:18 AM IST

    • GT vs SRH IPL 2023 : आजच्या सामन्यात विजय मिळाला तर गुजरात आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहे.
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad (HT)

GT vs SRH IPL 2023 : आजच्या सामन्यात विजय मिळाला तर गुजरात आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहे.

    • GT vs SRH IPL 2023 : आजच्या सामन्यात विजय मिळाला तर गुजरात आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहे.

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad : आयपीएलमध्ये प्लेऑफच्या शर्यती सुरू झालेल्या असतानाच आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातचे १६ अंक झाले आहे, त्यामुळं हार्दिक पांड्याच्या संघाने आजचा सामना जिंकला तर गुजरात टायटन्स आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचं आयपीएलमधील आव्हान जवळपास संपलेलं आहे. त्यामुळं आता हैदराबाद गुजरातला अखेरच्या टप्प्यात पराभवाचा धक्का देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच आजचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न गुजरातचा असेल.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने १२ पैकी आठ सामने जिंकले आहे. त्यामुळं गुजरातला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. त्यानंतर चेन्नई, मुंबई आणि लखनौचे संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. त्यामुळं आता आजच्या सामन्यातून आयपीएलच्या प्लेऑफचं बरंच काहीसं चित्र स्पष्ट होणार आहे. आरसीबी अद्यापही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. याशिवाय केकेआरनेही सीएसकेचा पराभव करत प्लेऑफच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

गुजरात टायटन्सची संभावित प्लेईंग ११ :

हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, नूर अहमद आणि मोहम्मद शमी

सनरायझर्स हैदराबादची संभावित प्लेईंग ११ :

एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंह, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, विवरांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मार्को यान्सेन आणि मयंक मार्कंडेय