मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 Points Table : गुणतालिकेत RCB ची मोठी झेप, पराभवानंतर CSK ची अडचण वाढली, पॉइंट टेबलची स्थिती पाहा

IPL 2023 Points Table : गुणतालिकेत RCB ची मोठी झेप, पराभवानंतर CSK ची अडचण वाढली, पॉइंट टेबलची स्थिती पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 15, 2023 12:01 AM IST

IPL 2023 Points Table : आयपीएलमध्ये आज दोन सामने झाले. यातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) राजस्थान रॉयल्सचा (RR) ११२ धावांनी पराभव केला. यानंतर राजस्थान आयपीएलमधून जवळपास बाहेर झाला आहे. तर आरसीबीच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्याप जिवंत आहेत.

IPL 2023 Points Table
IPL 2023 Points Table

आयपीएल 2023 च्या ६१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा ६ विकेट्सने पराभव केला. १४ मे (रविवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकात्याला विजयासाठी १४४ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी ९ चेंडू राखून पूर्ण केले.

या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. कोलकाताच्या विजयाचे हिरो रिंकू सिंग आणि नितीश राणा होते. दोघांनी अर्धशतकी खेळी केली.

या सामन्यातील विजयासह कोलकाता संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. त्याचवेळी हा सामना जिंकून चेन्नईला प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्याची संधी होती, पण त्यांनी ती गमावली आहे. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला त्यांचा शेवटचा सामना जिंकावा लागेल, किंवा इतर संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.

दरम्यान, आयपीएलमध्ये आज दोन सामने झाले. यातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) राजस्थान रॉयल्सचा (RR) ११२ धावांनी  पराभव केला. यानंतर राजस्थान आयपीएलमधून जवळपास बाहेर झाला आहे. तर आरसीबीच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्याप जिवंत आहेत.

गुणतालिकेची स्थिती काय?

गुणतालिकेत, पहिल्या क्रमांकावर गुजरात टायटन्स आहे. हा संघ प्लेऑफमध्ये जवळपास दाखल झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स आहे. त्यांचे १३ सामन्यात१ १५ गुण आहेत. त्यांचा नेट रनरेट +०.४९३ इतका आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आहेत. त्यांचे १२ सामन्यात १४ गुण आहेत. त्यांचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. मुंबईचा नेट रनरेट -०.११७ इतका आहे. चौथ्या क्रमांकावर लखनौचा संघ आहे. त्यांचे १२ सामन्यात १३ गुण आहेत. त्यांचेही दोन सामने शिल्लक आहेत तर त्यांचा नेट रनरेट +०.३०९ इतका आहे.

पाचव्या क्रमांकावर आरसीबी आहे. आरसीबीचे १२ सामन्यात गुण असून त्यांचेही दोन सामने शिल्लक आहेत. त्यांचा नेट रनरेट +०.१६६ इतका आहे. आरसीबीला पुढचे दोन्ही सामने जिंकून प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे.

यानंतर सहाव्या क्रमांकावर राजस्थान, सातव्या केकेआर आठव्या पंजाब, हैदराबाद आणि शेवटी दिल्लीचा नंबर आहे.

 

WhatsApp channel