मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni Autograph : ऐतिहासिक क्षण! धावत जाऊन सुनील गावस्करांनी छातीवर घेतला धोनीचा ऑटोग्राफ, चाहते भारावले

MS Dhoni Autograph : ऐतिहासिक क्षण! धावत जाऊन सुनील गावस्करांनी छातीवर घेतला धोनीचा ऑटोग्राफ, चाहते भारावले

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 15, 2023 01:26 AM IST

sunil gavaskar takes ms dhoni autograph : सामना संपल्यानंतर धोनीने चेपॉकमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. त्यानंतर रिंकू सिंग आणि चक्रवर्तीच्या जर्सीवर ऑटोग्राफ दिला. यादरम्यान सुनील गावस्कर यांनीही धोनीकडून ऑटोग्राफ (sunil gavaskar MS Dhoni Autograph) घेतला.

sunil gavaskar MS Dhoni Autograph
sunil gavaskar MS Dhoni Autograph

MS Dhoni Last Match At Chepauk : आयपीएल 2023 च्या ६१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा ६ विकेट्सने पराभव केला. १४ मे (रविवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकात्याला विजयासाठी १४४ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी ९ चेंडू राखून पूर्ण केले.

दरम्यान, सामना संपल्यानंतर मैदानावर एक असा प्रसंग घडला, ज्याची कल्पना कुणीही केली नसेल. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर धोनीचा ऑटोग्राफ (sunil gavaskar MS Dhoni Autograph) घेण्यासाठी त्याच्याकडे धावत आले आणि त्यांनी आपल्या शर्टवर धोनीचा ऑटोग्राफ घेतला. हा प्रसंग पाहून चाहते भारावले आहेत. तसेच हा क्षण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

वास्तविक, चेपॉक येथील मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा या मोसमातील हा शेवटचा सामना होता आणि बहुधा कर्णधार एमएस धोनीसाठीही चेपॉकवर हा त्याचा शेवटचा सामना होता. यामुळे सामना संपल्यानंतर धोनीने संपूर्ण मैदानाला गोल फेरी मारली. तसेच चेन्नईच्या चाहत्यांना जर्सी गिफ्ट केल्या. यादरम्यान धोनीने केकेआरच्या अनेक खेळाडूंना ऑटोग्राफ दिला. तसेच, ग्राउंड स्टाफशीदेखील मनमोकळेपणाने चर्चा केली.

सुनील गावस्कर यांना शर्टवर ऑटोग्राफ

हे सर्व घडत असताना सुनील गावस्कर धोनी जवळ पोहचले आणि त्यांनी धोनीला शर्टवर ऑटोग्राफ मागितला. धोनीनेही हसत हसत त्यांच्या शर्टवर सही केली. धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल, असे मानले जात आहे. मात्र, त्याच्या नुकत्याच आलेल्या काही विधानांमुळे तो पुढील हंगामातही खेळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेन्नईचा पराभव

नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शिवम दुबेच्या नाबाद ४८ धावांच्या जोरावर सीएसकेने १४४ धावा केल्या. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा डाव फसला होता, मात्र रिंकू सिंग आणि कर्णधार नितीश राणा यांनी उत्कृष्ट खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. राणाने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. राणा आणि रिंकून अर्धशतकं ठोकली.

WhatsApp channel