मराठी बातम्या  /  क्रीडा  /  कसोटीत ben stokes चा भीम पराक्रम, 'असं' करणारा जगातला केवळ तिसराच फलंदाज

कसोटीत ben stokes चा भीम पराक्रम, 'असं' करणारा जगातला केवळ तिसराच फलंदाज

Jun 24, 2022, 09:32 PM IST

    • कसोटी क्रिकेटमध्ये (test cricket) सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंड कसोटी संघाचा विद्यमान प्रशिक्षक आणि माजी किवी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या (brendon mccullum) नावावर आहे. ब्रेंडन मॅक्क्युलमने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०७ षटकार ठोकले आहेत.
ben stokes

कसोटी क्रिकेटमध्ये (test cricket) सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंड कसोटी संघाचा विद्यमान प्रशिक्षक आणि माजी किवी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या (brendon mccullum) नावावर आहे. ब्रेंडन मॅक्क्युलमने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०७ षटकार ठोकले आहेत.

    • कसोटी क्रिकेटमध्ये (test cricket) सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंड कसोटी संघाचा विद्यमान प्रशिक्षक आणि माजी किवी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या (brendon mccullum) नावावर आहे. ब्रेंडन मॅक्क्युलमने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०७ षटकार ठोकले आहेत.

इंग्लंड आणि न्यूझीलंड (england vs newzeland) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारपासून (२३ जून) लीड्स येथे खेळवण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने इंग्लंडने जिंकले आहेत. मालिकेत यजमान इंग्लंड २-० ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (ben stokes) एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण केले आहेत.

बेन स्टोक्सपूर्वी न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलम आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकले आहेत. बेन स्टोक्सने आपल्या १५१ व्या कसोटी डावात हा पराक्रम केला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंड कसोटी संघाचा विद्यमान प्रशिक्षक आणि माजी किवी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. ब्रेंडन मॅक्क्युलमने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०७ षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर ९६ कसोटी सामन्यांमध्ये १०० षटकार आहेत. इंग्लंडच्या कर्णधाराने ९६ कसोटी सामन्यांमध्ये १०० षटकार ठोकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टनेही ९६ कसोटींमध्येच हा पराक्रम केला होता.

कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप ५ फलंदाज-

हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टीम साऊदीच्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर तो कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकणारा जगातला तिसरा फलंदाज ठरला आहे. याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने ९८ तर दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू जॅक कॅलिसने ९७ षटकार ठोकले आहेत. अशाप्रकारे, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या टॉप पाच खेळाडूंच्या यादीत बेन स्टोक्स, ब्रेंडन मॅक्युलम, अॅडम गिलख्रिस्ट, ख्रिस गेल आणि जॅक कॅलिस यांचा समावेश आहे.