मराठी बातम्या  /  क्रीडा  /  फ्लेमिंग-टेलरलाही जमलं नाही, ७३ वर्षांनंतर प्रथमच डॅरेल मिचेलची ‘अशी’ कामगिरी

फ्लेमिंग-टेलरलाही जमलं नाही, ७३ वर्षांनंतर प्रथमच डॅरेल मिचेलची ‘अशी’ कामगिरी

Jun 24, 2022, 09:03 PM IST

    • डॅरेल मिचेलच्या (daryl mitchell) आधी अशी कामगिरी ही ७३ वर्षांपूर्वी म्हणजे १९४९ मध्ये न्यूझीलंडच्या बर्ट सटक्लिफने केली होती. १९४९ च्या इंग्लंड दौऱ्यावर सटक्लिफने सात डावात ४५१ धावा केल्या होत्या.
daryl mitchell

डॅरेल मिचेलच्या (daryl mitchell) आधी अशी कामगिरी ही ७३ वर्षांपूर्वी म्हणजे १९४९ मध्ये न्यूझीलंडच्या बर्ट सटक्लिफने केली होती. १९४९ च्या इंग्लंड दौऱ्यावर सटक्लिफने सात डावात ४५१ धावा केल्या होत्या.

    • डॅरेल मिचेलच्या (daryl mitchell) आधी अशी कामगिरी ही ७३ वर्षांपूर्वी म्हणजे १९४९ मध्ये न्यूझीलंडच्या बर्ट सटक्लिफने केली होती. १९४९ च्या इंग्लंड दौऱ्यावर सटक्लिफने सात डावात ४५१ धावा केल्या होत्या.

इंग्लंड आणि न्यूझीलंड (england vs newzeland) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारपासून (२३ जून) लीड्स येथे खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या डॅरेल मिचेलने या मालिकेत आपल्या कामगिरीने अनेकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत त्याने आतापर्यंत दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. तिसर्‍या कसोटीतही मिचेलने शानदार शतक झळकावले आहे. या शतकासह मिचेलने एक खास विक्रम आपल्या केला आहे. जो न्यूझीलंडचे दिग्गज फलंदाज स्टीफन फ्लेमिंग आणि रॉस टेलर यांनाही त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतही साधता आला नाही. मिचेलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ४०० हून अधिक धावा केल्या आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ४०० हून अधिक धावा करणारा मिशेल हा ७३ वर्षांतील न्यूझीलंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. पहिल्या दिवशी मिचेल ७८ धावांवर नाबाद राहिला होता. दुसऱ्या दिवशी त्याने त्याचे शतक पूर्ण केले. मिचेल १०९ धावा काढून बाद झाला. मिचेलने सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत पाच डावांत ४५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी १५० पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर मिचेलची या मालिकेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ही १९० धावा आहे.

डॅरेल मिचेलच्या आधी अशी कामगिरी ही ७३ वर्षांपूर्वी म्हणजे १९४९ मध्ये न्यूझीलंडच्या बर्ट सटक्लिफने केली होती. १९४९ च्या इंग्लंड दौऱ्यावर सटक्लिफने सात डावात ४५१ धावा केल्या होत्या. त्याने या दौऱ्यात एक शतक आणि चार अर्धशतकं झळकावली. मिचेलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सटक्लिफला मागे टाकून सर्वाधिक धावांचा विक्रम करण्याची संधी आहे. सध्या दोघांच्या धावा बरोबरीत आहे.