मराठी बातम्या  /  क्रीडा  /  श्रीलंकेत वीज टंचाई! ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ हैराण; फोटो शेअर करत म्हणाले…

श्रीलंकेत वीज टंचाई! ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ हैराण; फोटो शेअर करत म्हणाले…

Jun 24, 2022, 08:12 PM IST

    • श्रीलंकेच्या संघाने(austrelia vs srilanka) पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने तब्बल ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेच्या भूमीवर एकदिवसीय मालिकेत पराभूत केले आहे.
pat cummins (twitter, pat cummins)

श्रीलंकेच्या संघाने(austrelia vs srilanka) पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने तब्बल ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेच्या भूमीवर एकदिवसीय मालिकेत पराभूत केले आहे.

    • श्रीलंकेच्या संघाने(austrelia vs srilanka) पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने तब्बल ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेच्या भूमीवर एकदिवसीय मालिकेत पराभूत केले आहे.

श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीपासून देशात अन्न, औषधे आणि इंधन यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई जाणवत आहे. महागाईनेही विक्रमी उच्चांक गाठला असून आहे. विजेचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. यानंतर लोकांनी सरकारविरोधात निदर्शनेही केली. या सर्व प्रकारामुळे देशाचे अध्यक्ष गोटाबाया राजपाक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघ टी-२०, वनडे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेत पोहोचला आहे. यावेळी या विजेच्या संकाटातून ऑस्ट्रेलियाचा संघही सुटू शकला नाही.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने एक फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. हा फोटो पाचव्या एकदिवसीय सामन्यापूर्वीचा आहे. फोटोमध्ये कमिन्स त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत जेवायला बसला आहे. मात्र, त्याच वेळी वीज गायब झाली. सर्व खेळाडूंना रेस्टॉरंटमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशात वीज परत येण्याची वाट पाहावी लागली.

या प्रसंगाचा फोटो ट्विटरवर शेअर करताना कमिन्सने लिहिले की, “आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये वीज येण्याची वाट पाहत बसलो आहोत. वीज येताच आम्ही रात्रीचे जेवण सुरू करू. श्रीलंका सध्या अत्यंत कठीण काळातून जात आहे पण येथील लोक उत्कृष्ट आहेत. आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला.”

श्रीलंकेच्या संघाने पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने तब्बल ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेच्या भूमीवर एकदिवसीय मालिकेत पराभूत केले आहे. त्याचबरोबर या आधी झालेल्या टी-२० मालिकेत कांगारू संघाने २-१ असा विजय मिळवला होता. उभय संघांमधील दोन कसोटी सामन्यांची मालिका २९ जूनपासून गाले येथे सुरू होणार आहे. यानंतर ८ जुलैपासून याच मैदानावर दुसरी कसोटीही खेळवली जाणार आहे.