मराठी बातम्या  /  धर्म  /  Sheetala Ashtami 2023 : शीतला अष्टमीच्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी करावे 'हे' उपाय

Sheetala Ashtami 2023 : शीतला अष्टमीच्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी करावे 'हे' उपाय

Mar 14, 2023, 10:38 AM IST

  • How To Take Blessings Of Sheetala Mata : शीतला मातेला चेचक नामक रोगाची देवी असं म्हटलं जातं. त्यामुळेच शीतला मातेकडे शीतला अष्टमीच्या दिवशी आमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घे असं साकडं घातलं जातं

शीतला माता (हिंदुस्तान टाइम्स)

How To Take Blessings Of Sheetala Mata : शीतला मातेला चेचक नामक रोगाची देवी असं म्हटलं जातं. त्यामुळेच शीतला मातेकडे शीतला अष्टमीच्या दिवशी आमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घे असं साकडं घातलं जातं

  • How To Take Blessings Of Sheetala Mata : शीतला मातेला चेचक नामक रोगाची देवी असं म्हटलं जातं. त्यामुळेच शीतला मातेकडे शीतला अष्टमीच्या दिवशी आमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घे असं साकडं घातलं जातं

शीतला अष्टमीचा दिवस उद्या म्हणजेच १५ मार्च २०२३ रोजी साजरा केला जाणार आहे.स्कंद पुराणानुसार, शीतला देवी ही चेचक नामक रोगाची देवी आहे, त्यामुळेच शीतला मातेला शीतला अष्टमीच्या दिवशी आमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घे, त्यांच्या आरोग्याचं रक्षण कर, अशी प्रार्थना भाविक शीतला मातेला करतात. शीतला अष्टमीच्या दिवशी शीतला मातेला प्रसन्न कसं करावं यासाठी काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Chardham Yatra 2024 : चारधाममध्ये कोणत्या देवी-देवतांची पूजा केली जाते? जाणून घ्या

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला करा हे उपाय, सर्व अडचणी दूर होतील

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

शीतला अष्टमीच्या दिवशी कोणते उपाय करावेत.

शीतला अष्टमीच्या दिवशी शीतला मातेला जल अर्पण करा. जल अर्पण करताना त्या तांब्यातलं थोडं पाणी वाचवून ठेवा आणि ते घरात शिंपडा. असं केल्यास घरात सुख शांती राहाते.

शीतला अष्टमीच्या दिवशी पूजा करताना मातेला कुंकू, अक्षता आणि लाल रंगाची फुले अर्पण करा, यामुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

शीतला मातेची पूजा करताना खालील मंत्राचा जप अवश्य करावा.

मंत्र

शीतले त्वं जगन्माता शीतले त्वं जगत्पिता। नमो नमः ते शीतले त्वं जगद्धात्री शीतलाय..” ओम ह्रीं श्री शीतलयै नमः” धायामी शीतलां देवी, रसस्थान दिगंबरम्।, मर्जानी-कल्शोपेता शूर्पालंकृत-मस्तकम्।

अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर देवघरात दिवा लावा आणि हातात फुले, अक्षता, जल आणि दक्षिणा घेऊन व्रत करा.

शीतला मातेला शिळे अन्न अर्पण करावे

माता शीतलाला शिळे अन्न अत्यंत प्रिय असते अशी धार्मिक श्रद्धा आहे. गोड भात, रबडी, पुरी, हलवा, इत्यादी पदार्थ शीतला अष्टमीच्या एक दिवस आधी तयार केले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त शिळे अन्न देवीला अर्पण केले जाते आणि ते प्रसाद म्हणून खाल्ले जाते.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा