मराठी बातम्या  /  धर्म  /  Sheetala Ashtami 2023 : या अष्टमीला प्रसाद म्हणून देवीला शिळं अन्न दिलं जातं आणि ग्रहणही केलं जातं

Sheetala Ashtami 2023 : या अष्टमीला प्रसाद म्हणून देवीला शिळं अन्न दिलं जातं आणि ग्रहणही केलं जातं

Mar 10, 2023, 01:09 PM IST

  • Importance Of Sheetala Ashtami : शीतला अष्टमी हे व्रत आपल्या लहान मुलांचा विविध आजारांपासून बचाव व्हावा यासाठी केलं जातं. या व्रताची माहिती आपल्याला घ्यायची आहे

शीतला अष्टमी (हिंदुस्तान टाइम्स)

Importance Of Sheetala Ashtami : शीतला अष्टमी हे व्रत आपल्या लहान मुलांचा विविध आजारांपासून बचाव व्हावा यासाठी केलं जातं. या व्रताची माहिती आपल्याला घ्यायची आहे

  • Importance Of Sheetala Ashtami : शीतला अष्टमी हे व्रत आपल्या लहान मुलांचा विविध आजारांपासून बचाव व्हावा यासाठी केलं जातं. या व्रताची माहिती आपल्याला घ्यायची आहे

होळीचा सण आपण नुकताच साजरा केला. होलिकेचं दहन करुन आपण आपल्या प्रियजनांचं अशुभ सावट दूर व्हावं यासाठी प्रार्थना केली. होलिकेच्या सणानंतर आता माता दुर्गेच्या रुपातल्या शीतला मातेच्या पूजेची तयारी करणार आहोत. खासकरुन शीतला अष्टमी हे व्रत आपल्या लहान मुलांचा विविध आजारांपासून बचाव व्हावा यासाठी केलं जातं. या व्रताची माहिती आपल्याला घ्यायची आहेच, मात्र त्याआधी शीतला अष्टमी कधी आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

कधी आहे शीतला अष्टमी?  

शीतला सप्तमी आणि अष्टमी तिथी

शीतला सप्तमी तिथी १३ मार्च रोजी रात्री ०९.२७ मिनिटांनी सुरू होईल. १४ मार्च रोजी ०८.२२ मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार १४ मार्च रोजी शीतला सप्तमी साजरी होणार आहे. पूजेची वेळ सकाळी ०६.३१ ते सायंकाळी ०६.२९ अशी असेल. तर शीतला अष्टमी १४ मार्चच्या रात्री ०८.२२ पासून सुरू होईल. १५ मार्चला संध्याकाळी ०६.४५ वाजता संपेल.

शीतला अष्टमीचं महत्व काय आहे?

होळीनंतर माता दुर्गेच्या रूपातील शीतलाच्या पूजेला महत्त्व आहे. लहान मुलांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. या अष्टमीला शीतला मातेला अनेक ठिकाणी शिळं अन्न प्रसाद म्हणून दिलं जातं. त्याचबरोबर शिळे अन्नच प्रसाद म्हणून स्वीकारावे लागते. त्यामुळेच शीतला अष्टमीला काही ठिकाणी बसोडा असेही म्हणतात.  या दिवशी दुर्गा मातेचे रूप मानल्या जाणार्‍या शीतलाची विधिवत पूजा केली जाते.स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि रोगांपासून मुक्त राहण्यासाठी उपवास करतात. स्कंद पुराणात शीतला मातेला संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करणारी देवी मानण्यात आली आहे.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या