मराठी बातम्या  /  धर्म  /  Amalaki Ekadashi 2023 : भगवान श्रीविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी ब्रम्हदेवांनी का केली होती तपश्चर्या?

Amalaki Ekadashi 2023 : भगवान श्रीविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी ब्रम्हदेवांनी का केली होती तपश्चर्या?

Feb 27, 2023, 07:01 AM IST

  • Story Of Amalaki Ekadashi : आमलकी एकादशी आणि आवळ्यांचं झाड किंवा आमलकी एकादशी आणि श्रीविष्णू यांचा संबंध काय आहे. त्यामागची कथा काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

भगवान श्रीविष्णू (हिंदुस्तान टाइम्स)

Story Of Amalaki Ekadashi : आमलकी एकादशी आणि आवळ्यांचं झाड किंवा आमलकी एकादशी आणि श्रीविष्णू यांचा संबंध काय आहे. त्यामागची कथा काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

  • Story Of Amalaki Ekadashi : आमलकी एकादशी आणि आवळ्यांचं झाड किंवा आमलकी एकादशी आणि श्रीविष्णू यांचा संबंध काय आहे. त्यामागची कथा काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

आमलकी एकादशी ३ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. आमलकी एकादशीचे मुहूर्त काय आहेत आणि आमलकी एकादशी कशी साजरी करावी हे आपण आधीच पाहीलं आहे मात्र आता आमलकी एकादशी आणि आवळ्यांचं झाड किंवा आमलकी एकादशी आणि श्रीविष्णू यांचा संबंध काय आहे. त्यामागची कथा काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

Gemstones : तुमच्या राशीनुसार हे रत्न धारण करा, भाग्य उजळेल, आर्थिक भरभराट होईल, जाणून घ्या

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थी कधी? यंदा चतुर्थीला तयार होतायत हे शुभ संयोग, जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

काय आहे आमलकी एकादशीच्या मागची कथा

ब्रम्हाजींची उत्पत्ती भगवान श्रीविष्णूंच्या नाभीतून झाली. मात्र आपल्या उत्पत्तीचं कारण काय आहे हे ब्रम्हदेवांना कळेचना. मग आपल्या जन्माचं कारण जाणून घेण्यासाठी ब्रम्हदेवांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रम्हदेवांना दर्शन दिले. भगवान विष्णूंना पाहून ब्रह्माजींचे अश्रू वाहू लागले. ब्रह्मदेवाच्या त्या अश्रूंपासून आवळ्याच्या वृक्षाचा जन्म झाला.

आवळा वृक्षाचे देववृक्ष म्हणून वर्णन करताना भगवान श्रीविष्णू म्हणाले की, या झाडामध्ये देवी-देवता वास करतील. जो कोणी आवळ्याच्या वृक्षाखाली त्याची पूजा करेल आणि उपवास करेल. त्याची सर्व पापे नष्ट होतील आणि तो मोक्ष प्राप्त करून स्वर्गाचा स्वामी होईल. तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन शुक्ल एकादशीला आमलकी एकादशीचे व्रत करून आवळा वृक्षाची पूजा केली जाते. आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते.

आवळ्याचं महत्व काय

साधारपणे होळीपासून शरद ऋतू संपून, वसंत ऋतूचा आरंभ होतो. वसंत ऋतूत तापट उन्हाळा अनुभवायला मिळतो. अशात गोष्टी फार उष्ण होऊ लागतात. त्यावर उपाय म्हणूनही आवळ्यातकडे पाहिलं जातं.आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोग अनन्य साधारण आहेत. मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यांसाठी गुणकारी, संसर्गापासून संरक्षण करणे, असे आवळ्याचे उपाय आहेत.

आमलकी एकादशीचा मुहूर्त २०२३

आमलकी एकादशी तिथीची सुरुवात: २ मार्च सकाळी ६.३९ वाजता

आमलकी एकादशी तिथी समाप्त: ३ मार्च सकाळी ९.११ वाजता

आमलकी एकादशीला विष्णूपूजेचा मुहूर्त: सकाळी ६.४५ ते ११.०६

आमलकी एकादशी व्रताचे पारण

४ मार्च रोजी आमलकी एकादशीचं व्रत साजरं करण्यात येणार आहे. या दिवशी पारणाची वेळ सकाळी ६.४४ ते ९.०३ पर्यंत आहे. यावेळी पारण करून व्रत पूर्ण करावे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा