मराठी बातम्या  /  धर्म  /  amalaki ekadashi 2023 : आमलकी एकदशीचा इतिहास काय?, कशी करावी पूजा?

amalaki ekadashi 2023 : आमलकी एकदशीचा इतिहास काय?, कशी करावी पूजा?

Feb 24, 2023, 07:13 AM IST

  • Importance Of Amalaki Ekadashi : असं म्हणतात की श्रीविष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं. त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलकी एकादशी असं संबोधलं जातं.

काय सांगतो आमलकी एकादशीचा इतिहास (हिंदुस्तान टाइम्स)

Importance Of Amalaki Ekadashi : असं म्हणतात की श्रीविष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं. त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलकी एकादशी असं संबोधलं जातं.

  • Importance Of Amalaki Ekadashi : असं म्हणतात की श्रीविष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं. त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलकी एकादशी असं संबोधलं जातं.

असं म्हणतात की ब्रम्हदेवांनी जेव्हा सृष्टीची उत्पत्ती केली तेव्हाच त्यांनी आवळ्याच्या झाडाचीही उत्पत्ती केली. आवळा आयुर्वेदात अत्यंत पूजनीय स्थान प्राप्त करतो. आवळ्याचे अनेक फायदेही आपल्याला माहिती आहेत. आमलकी एकादशी काही दिवसांवर आली असल्याने आपण या एकादशी बाबत माहिती घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Ravi Pradosh Vrat 2024 : मे महिन्याचे पहिले प्रदोष वृत कधी? शुभ मुहूर्त, पुजा कशी करायची? जाणून घ्या

May 2024 Shubh Muhurat : विवाह, गृहप्रवेश ते नामकरण… मे महिन्यातील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या

Auspicious Yogas : तुमच्या कुंडलीत हे ४ योग आहेत का? असतील तर एक दिवस तुम्ही नक्की करोडपती व्हाल!

Hanuman Jayanti : हनुमान जन्मोत्सव आणि हनुमान जयंतीत काय फरक आहे? तुमचाही गोंधळ होतो, जाणून घ्या

आमलकी एकादशी म्हणजे काय

वर सांगितल्याप्रमाणे ब्रम्हदेवांनी सृष्टीसोबतच आवळ्याचं झाड पृथ्वीवर निर्माण केलं. सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी म्हणून आपण गंगेला पाहातो, देवांमध्ये भगवान श्रीविष्णूंना पाहातो तसंच आवळ्याला शास्त्रामध्ये परमोच्च स्थान प्राप्त झालं आहे. हे झाड अनेक आयुर्वेदीक फायदे घेऊन येण्याबरोबरच भगवान श्रीविष्णूंनाही हे झाड अत्यंत प्रिय आहे. असं म्हणतात की श्रीविष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं. त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलकी एकादशी असं संबोधलं जातं.

आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते. 

आवळ्याचं महत्व काय

साधारपणे होळीपासून शरद ऋतू संपून, वसंत ऋतूचा आरंभ होतो. वसंत ऋतूत तापट उन्हाळा अनुभवायला मिळतो. अशात गोष्टी फार उष्ण होऊ लागतात. त्यावर उपाय म्हणूनही आवळ्यातकडे पाहिलं जातं.आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोग अनन्य साधारण आहेत. मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यांसाठी गुणकारी, संसर्गापासून संरक्षण करणे, असे आवळ्याचे उपाय आहेत.

आमलकी एकादशीचं व्रत कसं करावं

आमलकी एकादशीदिवशी सकाळी उठून व्रताचा संकल्प करावा. दिवसात फक्त एकदाच फलाहार करावा. भगवान श्री विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा एका चौरंगावर स्थापित करावी. श्रीविष्णूचे आवाहन करून त्याचे पूजन करावे. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्रनामाचेही पठण करावे. भगवंताला नैवेद्य दाखवावा. महत्वाचं म्हणजे हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त होत नाही. त्यामुळे या व्रताची समाप्ती द्वादशीला यथाशक्ती अन्नदान करून करावी.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा