मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Crime News : आमंत्रणाशिवाय लग्नात जेवणं बेतलं जीवावर; वऱ्हाडींकडून तरुणाची निर्घृण हत्या

Delhi Crime News : आमंत्रणाशिवाय लग्नात जेवणं बेतलं जीवावर; वऱ्हाडींकडून तरुणाची निर्घृण हत्या

Dec 04, 2022, 08:30 AM IST

    • Delhi Crime News : मृत तरुण आमंत्रण नसताना लग्नात जेवण करायला आला होता. लग्नातील लोकांना याबाबतची माहिती समजताच त्यांनी युवकाला मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Delhi Crime News In Marathi (HT)

Delhi Crime News : मृत तरुण आमंत्रण नसताना लग्नात जेवण करायला आला होता. लग्नातील लोकांना याबाबतची माहिती समजताच त्यांनी युवकाला मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

    • Delhi Crime News : मृत तरुण आमंत्रण नसताना लग्नात जेवण करायला आला होता. लग्नातील लोकांना याबाबतची माहिती समजताच त्यांनी युवकाला मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Delhi Crime News In Marathi : कोणतंही आमंत्रण नसताना लग्नात जेवायला जाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. लग्नात जेवायला गेलेल्या एका तरुणाला वऱ्हाडींनी मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. राजधानी दिल्लीत हा संतापजनक प्रकार घडला असून या घटनेमुळं शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण कौशल मुखिया हा दक्षिण दिल्लीतील सरिता विहार परिसरातील एका लग्नात जेवण करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला कोणतंही आमंत्रण देण्यात आलेलं नसल्याचं लक्षात येताच वऱ्हाडींनी त्याला जेवण करण्यासाठी का आल्याचा जाब विचारला. त्यानंतर शिवीगाळ झाल्यानंतर जमावानं त्याला मारहाण करायला सुरुवात केली. पट्टा, लाकडी दांडा आणि धारदार शस्त्रानं आरोपींनी त्याच्यावर वार केल्यानं कौशल मुखिया हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच कौशलचे नातेवाईक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं.

त्यानंतर मृत कौशलच्या नातेवाईकांनी आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. कौशलला मारहाण करून त्याची हत्या करणाऱ्या दोषी आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

विभाग