मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

May 02, 2024, 11:56 PM IST

  • NEET 2024 Hall Ticket : नीट परीक्षेचे हॉल तिकीट जारी करण्यात आले असून अधिकृत वेबसाईटवरून ते डाऊनलोड करू शकता. प्रवेशपत्र थेट डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही येथे देत आहोत.

नीट परीक्षेचे हॉलतिकीट जारी

NEET 2024 Hall Ticket : नीट परीक्षेचे हॉल तिकीट जारी करण्यात आले असून अधिकृत वेबसाईटवरून ते डाऊनलोड करू शकता. प्रवेशपत्र थेट डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही येथे देत आहोत.

  • NEET 2024 Hall Ticket : नीट परीक्षेचे हॉल तिकीट जारी करण्यात आले असून अधिकृत वेबसाईटवरून ते डाऊनलोड करू शकता. प्रवेशपत्र थेट डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही येथे देत आहोत.

NEET 2024 Hall Ticket Download Link: नीट यूजी २०२४ ॲडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. ही परीक्षेच्या ४ दिवस आधी NTA NEET वेबसाइटवर नीट परीक्षा हॉल तिकीट २०२४ डाउनलोड लिंक एक्टिव करण्यात आली आहे. त्याचबरोबर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक नोटीसही जारी केली आहे. यामध्ये एनईईटी २०२४ परीक्षेविषयी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.  तुम्ही या बातमीत दिलेल्या NEET Admit Card 2024 Download Link  वरून  आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

 
NEET UG २०२४ परीक्षेत चार विषय आहेत. प्रत्येक विषयात दोन सेक्शन असतील. सेक्शन अ मध्ये ३५ प्रश्न असतील तर सेक्शन ब मध्ये १५  प्रश्न असतील. या १५ प्रश्नांपैकी उमेदवारांना कोणतेही १० प्रश्न सोडवावे लागतील. परीक्षेचा पॅटर्न आणि सिलॅबस आधीच जारी करण्यात आला आहे. 

NEET Admit Card 2024 Link: नीट ॲडमिट कार्ड २०२४ कसे डाउलोड कराल?

  • राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा यूजी (NEET UG) च्या वेबसाइटला भेट द्या. ऑफिशियल वेबसाइटचा एड्रेस  https //exams.nta.ac.in/ neet/ आहे.
  • वेबसाईटवरील लेटेस्ट न्यूज सेक्शनवर क्लिक करून हिअर टू डाउनलोड एडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्यासमोह नीट लॉगिन पेज neet.ntaonline.in ओपन होईल. 
  • तेथे तुमचा नीट एप्लिकेशन नंबर, जन्म तारीख, सिक्योरिटी पिन आदि माहिती भरून सबमिट  करा. 
  • तुमचे एनईईटी यूजी ॲडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते चेक  करून डाउनलोड बटणावर क्लिक करा व त्याची प्रिंट काढून घ्या. 
  • डायरेक्ट लिंकवरून डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा - NEET 2024 Hall Ticket Download
     

NEET Exam 2024: देशातील ५५७ शहरात होईल परीक्षा -

एनटीए द्वारे जारी नोटीसनुसार देशातील ५५७ शहरात व परदेशातील १४ शहरांसह विविध केंद्रावर ५ मे २०२४ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.२० पर्यंत नीट यूजी परीक्षा घेतली जाईल. २४ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. 

NEET Exam City Slip ची सूचना -

नीट (यूजी) २०२४ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी नीट परीक्षा सिटी स्लिप आधीच जारी केली आहे. २४ एप्रिल रोजी एनटीएने NEET City Slip जारी केली होती. यामध्ये सांगितले होते की, तुमचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल.

उमेदवाराला परीक्षा केंद्रावर आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र घेऊन जावे लागेल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी उमेदवारांना परीक्षा केंद्रात दाखल व्हावे लागेल. 

विभाग

पुढील बातम्या