Sarkari Naukri: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये असिस्टंट मॅनेजर आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ircon.org वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
या भरतीअंतर्गत एकूण सहा पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एचआर, पर्सनल किंवा आयआर क्षेत्रात पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
पात्र उमेदवारांची किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड केली जाईल. त्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारांना देशाच्या विविध भागात तसेच परदेशात पाठवले जाऊ शकते.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी वेगवेगळे अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे, जे भरल्यानंतर परत केले जाणार नाहीत. सामान्य श्रेणी, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून १००० रुपये अर्ज शुल्क आकरले जाणार आहे. तर, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग, अनुसूचित जाती, एसटी, माजी सैनिक अपंग श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या