मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 04 December 2022 Live: अब्दुल सत्तारांवर कारवाई करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Marathi News Live Updates
Marathi News Live Updates(HT)

Marathi News 04 December 2022 Live: अब्दुल सत्तारांवर कारवाई करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Atik Sikandar Shaikh 03:58 AM ISTDec 04, 2022 09:28 AM
  • twitter
  • Share on Facebook

Marathi News Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेसनं अब्दुल सत्तार यांची राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यामुळं अब्दुल सत्तार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत.

Sun, 04 Dec 202203:55 AM IST

अब्दुल सत्तारांवर कारवाई करा; राज्यपाल कोश्यारींचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं अब्दुल सत्तार यांची राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यामुळं अब्दुल सत्तार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत.

Sun, 04 Dec 202202:00 AM IST

IND vs BAN : भारत आणि बांगलादेश भिडणार; दोन्ही संघामध्ये आज पहिला वनडे सामना

IND vs BAN ODI : भारत आणि बांगलादेशमध्ये आज पहिला वनडे सामना खेळवला जाणार आहे. ढाक्यातील शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार असून विश्वचषकापूर्वी तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे.

Sun, 04 Dec 202202:00 AM IST

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर कॉंग्रेसची नवी जबाबदारी; पक्षाध्यक्षपदासह आता राज्यसभेत विरोधी पक्षनेते

Mallikarjun Kharge LOP In Rajya Sabha : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर पक्षानं नवीन जबाबदारी सोपवली आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता खर्गेंना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याचा निर्णय कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यामुळं आता खर्गेंना आणखी एक मोठी जबाबदारी मिळाली आहे.

Sun, 04 Dec 202201:59 AM IST

MCD Election : दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू; आप आणि भाजपमध्ये रंगणात चुरशीची लढत

MCD Election : दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी आज मतदानास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील तिन्ही महापालिकांचं विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला होता. त्यानंतर आज पालिकेतील २५० जागांसाठी मतदान सुरू झालं आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्यानं दोन्ही पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे.

Sun, 04 Dec 202201:56 AM IST

samruddhi mahamarg : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची करणार पाहणी; नागपूर ते शिर्डी मार्ग लवकरच होणार खुला

samruddhi mahamarg : राज्यातील समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. नागपूर ते शिर्डी या दरम्यान महामार्गाचं लोकार्पण येत्या ११ डिसेंबरला पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्यानं महामार्गाची पाहणी करण्यासाठी आणि मोदींच्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.