मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Akash Ambani : अंबानी कुटूंबात छोट्या परीचे आगमन, आकाश व श्लोका दुसऱ्यांदा बनले आई-बाबा

Akash Ambani : अंबानी कुटूंबात छोट्या परीचे आगमन, आकाश व श्लोका दुसऱ्यांदा बनले आई-बाबा

May 31, 2023, 10:12 PM IST

  • Shloka mehta and akash ambani : मुकेश अंबानी पुन्हा आजोबा बनले आहेत. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्या पत्नी श्लोका मेहता यांनी मुलीला जन्म दिला आहे.

Shloka mehta and akash ambani

Shlokamehtaandakashambani : मुकेश अंबानी पुन्हा आजोबा बनले आहेत. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्या पत्नी श्लोका मेहता यांनी मुलीला जन्म दिला आहे.

  • Shloka mehta and akash ambani : मुकेश अंबानी पुन्हा आजोबा बनले आहेत. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्या पत्नी श्लोका मेहता यांनी मुलीला जन्म दिला आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात नवीन पाहुण्याचे आमगन झाले आहे. मुकेश अंबानी पुन्हा आजोबा बनले आहेत. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्या पत्नी श्लोका मेहता यांनी मुलीला जन्म दिला आहे. कन्या रत्नाच्या आगमनाने अंबानी कुटूंब आनंदात आहे. यापूर्वी २०२० मध्ये श्लोका अंबानीने मुलाला जन्म दिला होता. अंबानी कुटूंबाने आकाशच्या मोठ्या मुलाचे नाव पृथ्वी आकाश अंबानी ठेवले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स 'या' लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

Rahul Gandhi : राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!, माजी काँग्रेस नेत्याचा दावा

Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

Pilgrims from Amravati died: महाराष्ट्रातील चार भाविक पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघातात ठार


मुकेश अंबानी आणि नीता अंबानी पुन्हा आजोबा-आजी बनल्याचे वृत्त समोर आल्यानंतर लोकांकडून सोशल मीडियावर अंबानी परिवाराला शुभेच्छा दिल्या जात आहेत. लोक आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या मुलीच्या पहिल्या फोटोची प्रतीक्षा करत आहेत.

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह मार्च २०१९ मध्ये झाला होता. श्लोका आणि आकाश हे बालपणीचे मित्र आहेत. दिग्गज हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका एका वर्षानंतर आई झाली. १० डिसेंबर २०२० रोजी, श्लोकाने एका मुलाला जन्म दिला होता.

 

अशी सुरू झाली होती दोघांची लव्ह स्टोरी -
चार वर्षापूर्वी श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचा विवाह झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार आकाश १२ वीत असतानाच त्यांनी श्लोकाला प्रपोज केले होते. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र शिक्षणासाठी दोघांना वेगवेगळ्या विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागला होता. वेगळे राहुनही दोघांमधील प्रेम कमी झाले नाही. जेव्हा शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनी आपले नाते जाहीर केले व विवाहबद्द झाले होते.

 

विभाग