मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Lucknow Rape Case : मुलगी अंघोळीसाठी गेली की तो बाथरूममध्ये जायचा; नराधम बापाविरोधात गुन्हा

Lucknow Rape Case : मुलगी अंघोळीसाठी गेली की तो बाथरूममध्ये जायचा; नराधम बापाविरोधात गुन्हा

Jan 24, 2023, 04:30 PM IST

    • Lucknow UP Crime News : मुलगी अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली की वडील आत जाऊन तिच्यासोबत अश्लिल चाळे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Lucknow Crime News Marahi (HT_PRINT)

Lucknow UP Crime News : मुलगी अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली की वडील आत जाऊन तिच्यासोबत अश्लिल चाळे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • Lucknow UP Crime News : मुलगी अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली की वडील आत जाऊन तिच्यासोबत अश्लिल चाळे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lucknow Crime News Marahi : आपल्या पोटच्या पोरीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी नराधमाच्या किळसवाण्या कृत्याचा भांडाफोड झाला आहे. आरोपी गेल्या वर्षभरापासून आपल्याच मुलीला मारहाण आणि शिवीगाळ करत बलात्काराचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना घडली असून त्यानंतर आता पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गोमतीनगरमधील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या लखनौतील गोमतीनगरमध्ये राहणाऱ्या नराधमानं आपल्याच मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरापासून तरुणी बाथरुममध्ये अंघोळीसाठी जायची तेव्हा आरोपी तिच्यावर वाईट नजर टाकून बाथरुममध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. याशिवाय सातत्यानं तरुणीला मारहाण करत तिच्याशी छेडछाड करत असल्यामुळं तरुणीनं पोलिसांत तक्रार करण्याची धमकीही वडिलांना दिली होती. परंतु त्यानंतरही वडिलांनी तरुणीसमोर अश्लिल चाळे करणं थांबवलं नाही. त्यामुळं कंटाळलेल्या तरुणीनं घडलेला सारा प्रकार आपल्या आईजवळ सांगितला. या प्रकरणाबाबत पीडितेच्या आईनं पतीला जाब विचारला असता आरोपीनं पत्नीसह मुलीला बेदम मारहाण केली.

त्यानंतर आता पीडितेसह तिच्या आईनं आरोपी नराधमाविरोधात गोमतीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बापानंच आपल्या पोटच्या पोरीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानंतर लखनौतील गोमतीनगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी आणि तिच्या आईचा जबाब नोंदवल्यानंतर आता पोलिसांनी आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.