
urmila matondkar in bharat jodo yatra : अनेक राज्यांच्या प्रवास करत काँग्रेसची भारत जोडो यात्रा अखेरच्या टप्प्यासाठी जम्मू-काश्मिरमध्ये पोहचली आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या.
(HT)अभिनेत्री उर्मिला मातोंडकर त्यांचे पती मोहसीन अख्तर यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत. जम्मू-काश्मिरमध्ये त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला आहे.
(HT)उर्मिला मातोंडकर यांनी राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधूनच केली होती. परंतु त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.
(HT)उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव खासदार केसी वेणूगोपाल हे देखील उपस्थित होते.
(HT)

