मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  MP Crime : 'पुष्पा' सिनेमाच्या स्टाइलमध्ये ट्रकध्ये दारू लपवून तस्करी; असा झाला भांडाफोड

MP Crime : 'पुष्पा' सिनेमाच्या स्टाइलमध्ये ट्रकध्ये दारू लपवून तस्करी; असा झाला भांडाफोड

Nov 28, 2022, 02:29 PM IST

    • MP Crime news : पुष्पा चित्रपटासारखी गाडीत दारू लपवून तिची तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशातील शाजापुर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मक्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दारू गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
crime news

MP Crime news : पुष्पा चित्रपटासारखी गाडीत दारू लपवून तिची तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशातील शाजापुर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मक्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दारू गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

    • MP Crime news : पुष्पा चित्रपटासारखी गाडीत दारू लपवून तिची तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशातील शाजापुर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मक्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दारू गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

शाजापुर : मध्यप्रदेशातील शाजापुर येथे गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुष्पा स्टाइल दारूची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तब्बल ४५ लाख रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी शाजापुर पोलिस तपास करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स 'या' लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

Rahul Gandhi : राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!, माजी काँग्रेस नेत्याचा दावा

Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

Pilgrims from Amravati died: महाराष्ट्रातील चार भाविक पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघातात ठार

मध्यप्रदेशांतील शाजापुर जिल्ह्यात दारू तस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. शाजापुर येथे एका कंटेनर मध्ये फोम शीटच्या खाली तब्बल ५०० पेट्या दारुच्या पेट्या लपवण्यात आल्या होत्या. या प्रकरणी एकाला अटक कार्यात आली आहे. तब्बल ४५ लाख रुपयांची ही दारू असून ती हरियाणा येथून गुजरात येथे तस्करी केली जात असताना मक्सी पोलिसांनी पकडली.

शाजापुर पोलिसांना या तस्करी बाबत गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली. शाजापुर येथून हा ट्रक मक्सी येथून पुढे गुजरातला जात होता. या प्रकरणी एसपी जगदीश डावर यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मक्सी पोलिस ठाण्याचे प्रमुख गोपाल सिंह चौहान यांनी पोलिसांचे पथक तयार करत रात्री राष्ट्रीय महामार्गावर बरड़वा पुलावर बंदोबस्त लावला होता. यावेळी एक ट्रक थांबवण्यात आला. चालकाने पोलिसांना ट्रकमध्ये फोम सीट असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी कटरच्या साह्याने सीट फाडून पहिले असल्यास त्यात दारूच्या पेट्या आढळल्या. तब्बल ५०० पेट्या दारू या फोमच्या सीट मधून निघाल्या. चलकाची चौकशी केली असता, ही दारू हरियाणा येथील सुरेंद्र येथून ती गुजरातमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे नेली जात होती. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

शाजापुरचे एडिशनल एसपी टी. एस बघेल यांनी सांगितले की, पोलिस अधीक्षक यांना या बाबत माहिती मिळाली होती. एका ट्रक कंटेनर मधून ही दारू नेण्यात येणार होती. त्यांनी मक्सी येथील पोलिसांना याची माहिती देत सतनाम ढाब्याजवळ सापळा रचण्यास सांगितला. हा ट्रक येताच तो थांबवण्यात आला. कंटेनर तपासल्यावर फोमच्या सीट खाली तब्बल ४५ लाख रुपयांची ५०० पेट्या दारू आढळली. ट्रक कंटेनरवर गुजरातचा नंबर होता.

 

विभाग