मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mood of the Nation : शिंदे-फडणवीसांसाठी धोक्याची घंटा! आज निवडणुका झाल्या तर मविआ बाजी मारणार

Mood of the Nation : शिंदे-फडणवीसांसाठी धोक्याची घंटा! आज निवडणुका झाल्या तर मविआ बाजी मारणार

Jan 27, 2023, 03:47 PM IST

  • Mood of the Nation survey in Maharashtra : शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या व राजकीय बदला घेतल्याच्या आनंदात असलेल्या शिंदे-फडणवीसांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

MVA

Mood of the Nation survey in Maharashtra : शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या व राजकीय बदला घेतल्याच्या आनंदात असलेल्या शिंदे-फडणवीसांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

  • Mood of the Nation survey in Maharashtra : शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या व राजकीय बदला घेतल्याच्या आनंदात असलेल्या शिंदे-फडणवीसांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Mood of the Nation survey in Maharashtra : शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या व राजकीय बदला घेतल्याच्या आनंदात असलेल्या शिंदे-फडणवीसांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे सी व्होटर व इंडिया टूडेनं केलेल्या ताज्या मतदार पाहणीची. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी बाजी मारेल, असा पाहणीतून समोर आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

लोकसभेच्या निवडणुका आताच्या परिस्थितीत झाल्या तर कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाची परिस्थिती चांगली असेल? कोणाला किती जागा मिळू शकतात? कोणत्या पक्षांची आघाडी वरचढ ठरेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या सर्वेक्षणातून समोर आली आहेत. देशपातळीवरचा विचार करायचा झाल्यास भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पुन्हा एकदा सत्ता राखेल, हे स्पष्ट झालं आहे. एनडीएला २९८ जागा मिळतील तर काँग्रेस प्रणित यूपीए आघाडीला १५३ जागा मिळतील, असा निष्कर्ष आहे.

महाराष्ट्रात नेमकं काय होईल?

महाराष्ट्रात गेल्या काही काळात बऱ्याच राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाऊन भाजप-शिंदे गटाचं सरकार आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या विरोधात दंड थोपटणारी शिवसेना फुटीमुळं खिळखिळी झाली आहे. त्यामुळं पुढील प्रत्येक निवडणुकीत भाजप व त्यांचे मित्रपक्ष वरचढ ठरतील, असा एक कयास आहे. मात्र, महाराष्ट्राचा मूड वेगळाच असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट आणि रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीला केवळ १४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडी तब्बल ३४ जागांवर बाजी मारेल, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे कुठे?

देशातील सध्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, असा प्रश्नही सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव पुढं आलं आहे. तब्बल ३९ टक्के लोकांनी योगींना पसंती दिली आहे. अरविंद केजरीवाल दुसऱ्या, ममता बॅनर्जी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठव्या स्थानी आहेत. अवघ्या २.२ टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या बाजूनं मत व्यक्त केलं आहे.

विभाग