मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  New Congress President : मल्लिकार्जुन खर्गे कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष; शशी थरुर यांचा दारुण पराभव

New Congress President : मल्लिकार्जुन खर्गे कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष; शशी थरुर यांचा दारुण पराभव

Oct 19, 2022, 02:16 PM IST

    • Congress President Election Result : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात शशी थरुर यांचा दारुण पराभव झाला आहे. विजयी उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे हे आता कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष असतील.
Congress President Election Result 2022 (HT)

Congress President Election Result : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात शशी थरुर यांचा दारुण पराभव झाला आहे. विजयी उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे हे आता कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष असतील.

    • Congress President Election Result : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात शशी थरुर यांचा दारुण पराभव झाला आहे. विजयी उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे हे आता कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष असतील.

Congress President Election Result 2022 : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गेंचा मोठा विजय झाला आहे. त्यामुळं आता त्यांच्या कॉंग्रेसचे अध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला असून खर्गेंच्या विजयानंतर दिल्लीतील कॉंग्रेस कार्यालयाबाहेर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. खरगे यांच्यासमोर कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर यांचं आव्हान होतं. परंतु खर्गेंनी मोठ्या फरकानं विजय मिळवत थरुरांचा पराभव केला आहे. विजयानंतर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगेंना विजयाचं पत्र देत खर्गेंचं अभिनंदन केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पसंतीचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गेंना एकूण ७८९७ मतं मिळाली तर शशी थरुरांना केवळ १०७२ मतं मिळाली. त्यामुळं खर्गेंनी ६८२५ मतांनी विजय मिळवत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. मतमोजणीत तब्बल ४०० मतं बाद झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कॉंग्रेसमधील G23 गटाला मोठा राजकीय धक्का...

मल्लिकार्जुन खर्गे हे सोनिया आणि राहुल गांधींच्या पसंतीचे उमेदवार होते. तर दुसरीकडे पक्षातील असंतुष्ट आणि गांधी घराण्यावर नाराज असलेल्या G23 गटाच्या नेत्यांनी खासदार शशी थरुरांना रिंगणात उतरवलं होतं. त्यांनी प्रचाराची सुरुवात नागपूरातून केली होती. परंतु अनेक राज्यातील कॉंग्रेस कमिट्या या गांधी घराण्याशी एकनिष्ठ असल्यानं खर्गेंचा विजय निश्चित मानला जात होता. तर दुसरीकडे खर्गेंचं वय ८० च्या पार असल्यानं या निवडणुकीत तरुण आणि उच्चशिक्षित चेहरा असलेल्या थरुर यांचा विजय होईल, असा अंदाज लावला जात होता. परंतु या सर्व अंदाज आणि तर्कवितर्कांना फोल ठरवत मल्लिकार्जुन खर्गेंनी शशी थरुरांचा ६८२५ मतांनी पराभव केला आहे.

कॉंग्रेसला तब्बल २५ वर्षांनंतर मिळाला बिगरगांधी घराण्यातला अध्यक्ष....

१९९८ साली सीताराम केसरी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतरपासून सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या सलग अध्यक्षा झालेल्या आहेत. त्यामुळं आता मल्लिकार्जुन खर्गेंच्या रुपात कॉंग्रेसला दोन दशकांनंतर बिगरगांधी घराण्यातील अध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळं आता खर्गेंच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाचा कार्यकाळ कसा असणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.